सुरक्षितता.. !
आयुष्यभर आपण त्यासाठीच जगतो..
आणि त्यामुळे आपण फक्त पैश्यासाठी काम करत रहातो.
आपल्याला आवडणार्या गोष्टी आपण कधीच करत नाही. वेळच मिळत नाही आपल्याला.
या चक्रात अडकून आपण कधी निर्जीव यंत्र बनतो तेही आपल्याला कळत नाही.
आपल्यातले लहान बाळ कोमेजून आयुष्य कंटाळवाणे होते..
एकीकडे पैसे कमवून त्यातून मिळणाऱ्या भौतिक गोष्टींची आपणच आपल्या आजूबाजूला भिंत ऊभी करत जातो,
या भिंतीतील बंदिस्त जीवन जगत असताना अनेक शारीरिक व मानसिक स्वास्थ्य हरवून बसतो..
सर्व काही असतानाही आत एवढं रिकामं का वाटतं तेच कळत नाही.
या चक्रव्यूहातून बाहेर येण्यासाठीच आहे ज्ञानयोग..!
आपल्या मनाच्या खिडक्या अलगद उघडून आनंदाची तिरीप हळूच आत येते..
जवळ काहीही नसतानाही स्वतःच्या पूर्णत्वाची जाणीव होते..
आतून एवढे शांत शांत वाटते की डोळे तृप्ततेने कधी भरून वहायला लागतात व जीवन अनामिक पण सुखावणार्या अनुभूती ने कसे भरून जाते हे कळतही नाही..
आत राहते ते फक्त प्रेम, प्रेम अन् प्रेम..
यासाठी चैतन्य वनात येत रहा.. माऊलीजी 🙂