वेगवेगळ्या मुद्रा आणि विशिष्ट आसन (पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा वज्रासन) वापरून प्राणायाम केले जातात। प्राणायामापूर्वी केलेल्या व्यायामामुळे तयार होणारी ऊर्जा शरीरातील वेगवेगळ्या अवयवांना आणि पेशींना म्हणजे संपूर्ण शरीरात पोहोचवली जाते।
शीतली आणि शीतकारी: शरीरातील प्राणायामामुळे तयार झालेली अतिरिक्त उष्णता बाहेर काढण्यासाठी ही क्रिया।
प्राणायामामुळे होणारे फायदे
सजीवता
शरीरात प्राणशक्ती वाढते आणि दिवसभर ताजेतवाने वाटते.
मेंदूला आणि इतर अवयवांना पुरेसा ऑक्सिजन मिळाल्यामुळे चेतना जागृत होते आणि कार्यक्षमता वाढते.
जीवनशैली अधिक उत्साही, सक्रिय आणि सकारात्मक बनते.
श्वास
श्वासोच्छ्वास अधिक खोल आणि नियमित होतो.
फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते.
तणाव किंवा रागाच्या वेळी श्वासावर नियंत्रण येते.
ध्यानासाठी मन स्थिर होते.
समतोल
तणावातही मन शांत ठेवून भावनिक आणि मानसिक समतोल राखता येतो.
एकाग्रता वाढवून मन भटकू देत नाही.
श्वासाकडे लक्ष देताना आपण स्वतःच्या शरीर व मनाशी जोडले जातो.
आरोग्य
रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि मनाचे आरोग्य सुधारते.
पचनक्रिया सुधारल्याने अपचन व गॅस कमी होतो.
झोपेच्या समस्या दूर होऊन मन शांत होते.
शरीर अधिक कार्यक्षम व निरोगी राहते.
ध्यान
प्राणायामात ऊर्जा संपूर्ण शरीरात प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवली जाते...
ती ऊर्जा संपूर्ण दिवसभर आपल्या शरीरात राहावी यासाठी केले जाते ध्यान...
ध्यान म्हणजे मन शांत करून स्वतःकडे पाहण्याची सोपी आणि प्रभावी पद्धत,
जी आपल्याला अधिक एकाग्र, शांत आणि सकारात्मक बनवते।
मंत्र ध्यान
शांती ध्यान
निद्रा ध्यान
सक्रीय ध्यान
आरोग्य ध्यान
कुंडलिनी ध्यान
विशेष ध्यान
मंत्र ध्यान
शांती ध्यान
निद्रा ध्यान
सक्रीय ध्यान
आरोग्य ध्यान
कुंडलिनी ध्यान
विशेष ध्यान
गोपाळकाला
रोग आणि आजार या दोघानाही एका क्षणात दूर करणाऱ्या औषधाचे नाव ज्ञानयोग गोपाळकाला...
आपले जीवन व आरोग्य आपण स्वतः घडवतो। जर आहार बदलला, तर जीवनशैलीही बदलते।
गोपाळकाला आहार हा पारंपरिक, संतुलित आणि पोषणयुक्त आहार आहे।
भजन म्हणजे आपल्या आतल्या आनंदाची, उत्साहाची आणि समाधानाची अभिव्यक्ती! भजन गाण्यासाठी सुंदर आवाज लागत नाही, आधी अनुभव हवा असंही नाही. फक्त मनातील भाव शुद्ध असायला हवा.
भजनाची जादू
घरात सगळ्यांचे विचार वेगवेगळे असतात, पण भजनात सगळे एकत्र येतात. यातून नवी ऊर्जा मिळते, एकता वाढते आणि मन आनंदी राहतं.
भजन कोणासाठी ?
भजन हे फक्त मोठ्या माणसांसाठी नसून प्रत्येकासाठी आहे. हे केवळ टाळ वाजवणं नव्हे, तर मनाला आनंद, आत्मविश्वास आणि सकारात्मकता देणारी साधना आहे. भजन कुठल्याही एका धर्माचं नसून, तुम्हाला तुमच्या धर्माच्या मुळाशी आणि देवाजवळ नेणारं माध्यम आहे.
भजन : एक श्रेष्ठ ध्यानसाधना
भजनात टाळ्या, मान डोलवणं आणि शरीराची हालचाल यामुळे शरीर सक्रिय राहतं आणि मन एकाग्र होतं. हात वाईट करत नाहीत, मुखातून वाईट शब्द निघत नाहीत, आणि डोळे वाईट पाहत नाहीत—पूर्ण मन, शरीर आणि आत्मा एका लयीत गुंतलेले असतात.
कधी कधी न बोलता समजून घेणेही पुरेसे असते, अशांत मनाला आतून शांत करणारा आवाज इथे मिळतो;
विचारांपेक्षा अनुभव हवा असेल तर तोही इथे मिळतो, काय करावं न समजल्यावर फक्त ऐकणं उपयोगी ठरतं,
सगळं संपलं असं वाटतानाही एक विचार नवसंजीवनी देतो आणि थकवा असो वा गोंधळ…
इथे शांततेचे क्षण सापडतात – हेच आहे खरं माऊलीजींचं सत्संग.”
सत्संग मालिका
दिवसाची सकारात्मक सुरुवात!
सकाळची साधना
दररोज सकाळी ५:३८ ते ७:३० या वेळेत व्यायाम करा
प्राणायाम, ध्यान आणि योगामुळे तणाव कमी होतो, आरोग्य सुधारते आणि आत्मविश्वास वाढतो.