- आई आणि बायको भांडते याचा घरातल्या पुरुषाला सर्वात जास्त त्रास होतो, तो कोणा एकाची बाजू घेऊ शकत नाही, त्याची मनात घुसमट होते.. तेव्हा घरातील स्त्रियांनी एकमेकींना आपले समजा, घरातील वातावरण आनंदी ठेवा
- पुरुषांनी घरातील स्त्रियांचा आदर ठेवा, कौतुकाचे 2 शब्द बोला, स्त्रीची होणारी तारेवरची कसरत समजून घा.. आपल्या शब्दामुळे तिला आधार द्या.. निर्व्यसनी राहा
- घरातील विद्यार्थ्यांनी स्वतःसाठी अभ्यास करा तुम्ही अभ्यास केला तर त्यात आई बापाला नाही, तुम्हाला स्वतःला काहीतरी मिळणार आहे याची जाणीव ठेवा, संगत चांगली ठेवा, आईबापाला खोटे बोलून फसवू नका.
- एकच जीवन आहे त्यात राग ठेवून अबोला धरायचा व लोकांना तोडायचे की माफ करून प्रेमाने सोबत राहायचं याचा निर्णय विवेक बुद्धी वापरून तुम्हीच घ्या
- ज्ञानयोगाचा साधक हा नेहमी हसरा ,क्षण स्वीकारणारा, ऊर्जादायी, इतरांवर प्रेम करणारा, निर्व्यसनी, अडचणींना हिमतीने सामोरा जाणार आहे हे लक्षात ठेवा
माऊलीजी😊

