Official Website Of Maulijee – Dnyanyog Pratishthan, Chaitanyavan

सकारात्मकता हेच औषध

सारखे सारखे प्रत्येकाजवळ आजाराबद्दल बोलून तुमचे आजार दूर होतात का हो?

मग कशासाठी आजाराबद्दल बोलता?

 

त्याऐवजी मी आजारातून मुक्त होण्यासाठी रोज प्राणायाम करतो ध्यान करतो

कालच्या पेक्षा आज मला छान वाटते आहे 

मी आजारातून नक्की बाहेर पडणार आहे

असे सकारात्मक बोला..

 

कारण तुम्ही जसे बोलता तसे तुमचे विचार होतात 

आणि जसे तुमचे विचार असतात त्तशीच ऊर्जा तुम्हाला तुमच्या शरीरात जाणवते

तुम्ही नकारात्मक बोलला तर नकारात्मक ऊर्जा निर्माण होते

आणि तुम्ही अजून जास्त आजारी पडता..

 

तुम्ही सकारात्मक बोलला तर सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आजारातून तुम्ही मुक्त होता…

हे नुसतं वाचून होणार नाही आजपासून नकारात्मक बोलणं पूर्ण बंद करा 

आणि रोज प्राणायाम ध्यान साधना सूर्यनमस्कार सुरू करा..

 

सर्व व्यसनं सोडून ज्ञानयोग गोपाळकाला हा आहार घ्या..

आहारालाच औषध बनवा..

विचारालाच औषध बनवा..

जीवनशैलीला औषध बनवा..

आणि आत्मविश्वासाने जगा..

माऊलीजी😊

Scroll to Top