Quotes

क्रोध करून त्या सर्व गोष्टी गमावू नका ज्या तुम्ही शांत राहून कमावलेल्या आहेत.. माऊलीजी

वाईट सवयींमुळे आपल्या माणसांना सोडण्यापेक्षा, आपल्या माणसांसाठी वाईट सवयींना सोडा.. माऊलीजी

तुम्हाला जे वाटेल ते करा.. पण एवढे पक्के लक्षात ठेवा की..कर्म कधीच पत्ता विसरत नाही.. माऊलीजी

ज्याला एकाचवेळी दोन ससे पकडायचे आहेत.. तो एकही ससा पकडू शकत नाही.. आपल्या जीवनाचे ही अगदी असेच आहे.. माऊलीजी

सुखाच्या शोधात माणूस आयुष्यभर धावतो, पण आयुष्य कसं जगायचं हे त्याला दुःखच शिकवतं माऊलीजी

खोटे बोलणे, धोका देणे, एखाद्याला फसवणे याने क्षणिक सुख जरी मिळत असेल तरी नंतर आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो.. माऊलीजी

जेव्हा आयुष्य तुम्हाला पुन्हा नवीन संधी देते.. तेव्हा पुन्हा जुन्याच चुका करू नका.. माऊलीजी

काही लोकांच्या नुसतं सोबत राहिले तरीही.. आपल्या आयुष्यात सर्व काही ठीक होते.खरंच..!अनुभव घ्या..! माऊलीजी

आयुष्यात संघर्ष तेच लोक करू शकतात ज्यांच्यात जिंकण्याची जिद्द असते.. माऊलीजी

जेव्हा आपण स्वतः न बदलता, दुसऱ्याला बदलण्यात गुंततो तेव्हा आयुष्य खुप कठीण होते. माऊलीजी

जीवनात सर्व काही कधीच संपत नाही. आयुष्यात केव्हाही तुम्ही नवीन सुरुवात करु शकता.. फक्त हिम्मत हारु नका. नकारात्मक विचार करु नका.. माऊलीजी

जे आपला द्वेष करतात त्यांचा द्वेष करण्यात वेळ घालवू नका.. माऊलीजी

जे आपल्यावर प्रेम करतात त्यांच्या प्रेमात आनंदाने जगा.. माऊलीजी

जीवन एकदाच मिळते दुसऱ्या कोणामुळे तरी टेन्शन घेऊन जगणे सोडू नका माऊलीजी

आपल्या जीवनाला आनंदाने,प्रेमाने,विश्वासाने भरून प्रत्येक क्षण हसत खेळत जगा.. माऊलीजी

जेव्हा तुम्हाला तुमची स्वतःची किंमत कळेल तेव्हा दुसऱ्याने केलेल्या निंदा किंवा स्तुतीचा तुम्हाला फारसा फरक पडणार नाही माऊलीजी

तुम्हाला वाईट सवयी, वाईट व्यसन सोडायचे असेल तर आत्ताच सोडा मी हळूहळू सोडेल हे तुमचे खोटे नाटकं आहेत माऊलीजी

कितीही जागा बदला.. जोपर्यंत स्वतःला बदलत नाही.. तोपर्यंत जीवनातले दुःख कमी होणार नाही..
माऊलीजी

वेळ जेव्हा पलटते तेव्हा सर्वच काही पलटते म्हणून चांगल्या वेळी गर्व करू नका आणि वाईट वेळी धीर सोडू नका माऊलीजी

देवावर सर्व काही सोडण्यासाठी सुद्धा,
आपलं काम आपण प्रामाणिकपणे, मनापासून आणि आनंदातून करणं आवश्यक आहे..
माऊलीजी

जी माणसं आपला विचार बदलू शकत नाही ते आयुष्यात काहीही करू शकत नाही. माऊलीजी

जिथे जिथे तुमचा अपेक्षाभंग झाला तिथे नाराज न होता या अपेक्षाभंगा नंतर मी यापेक्षा छान काहीतरी करेल हा विश्वास ठेवून पुढे जात राहा.. माऊलीजी

आयुष्यात कोणतीही परिस्थिती असू द्या मनाने रिलॅक्स रहा तुमचे सर्व छानच होणार आहे हे feel करा आपल्याकडून जे शक्य आहे ते करत रहा बाकी सर्व देवावर सोडा.. माऊलीजी

जे व्हायचे ते घडूनच राहील, मग कशाला जास्त विचार करायचा.. आपण टेन्शन घेऊन जगण्यासाठी या विश्र्वात आलेलो नाही माऊलीजी

देवाला आपले पैसा, पद, प्रतिष्ठा नको आहे… अहो हे तर आपल्याला त्याच्या मुळेच मिळाले आहे..! देवाला फक्त आपली चांगले कर्म आवडतात माऊलीजी

जिथे जिथे तुमचा अपेक्षाभंग झाला तिथे नाराज न होता
या अपेक्षाभंगा नंतर मी यापेक्षा छान काहीतरी करेल हा विश्वास ठेवून पुढे जात राहा.. माऊलीजी

आयुष्यात कोणतीही परिस्थिती असू द्या मनाने रिलॅक्स रहा तुमचे सर्व छानच होणार आहे हे feel करा आपल्याकडून जे शक्य आहे ते करत रहा बाकी सर्व देवावर सोडा.. माऊलीजी

जे व्हायचे ते घडूनच राहील, मग कशाला जास्त विचार करायचा.. आपण टेन्शन घेऊन जगण्यासाठी या विश्र्वात आलेलो नाही माऊलीजी

आपली माणसं मोठी करा
आपण आपोआप मोठे होतो..
माऊलीजी

सोबत राहणाऱ्यांशी प्रेमाने बोलता येत नसेल तर तुमचे सर्व ज्ञान व्यर्थ आहे..!
माऊलीजी

कठीण काळामध्ये तुमच्या मनातून जो आवाज येतो की सर्व काही ठीक होईल, काळजी करू नको तोच आवाज हा परमेश्वराचा आवाज असतो.. माऊलीजी

युद्ध तुमच्या मनात सुरू असेल तर तुम्हाला.. धार धार शस्त्राची नाही तर जीवन आनंदाने जगण्याच्या शास्त्राची गरज आहे.. ते शास्त्र म्हणजेच “ज्ञानयोग” माऊलीजी

चांगले कार्य करत राहायची सवयच लावून घ्यायची.. सत्कर्म करत राहणे हा आपला स्वभावच बनवून घ्यायचा.. संकटाच्या वेळी काम येते ते फक्त आपल्या कर्मातून कमाविलेले पुण्य..! माऊलीजी

आयुष्यात स्वतःला चांगल्या कामात इतके व्यस्त ठेवा की…
आपल्याला कोणामुळे नाराज व्हायला वेळच मिळाला नाही पाहिजे…! आनंदी राहा .. ! माऊलीजी

मनात असणारे सर्वच नशिबात असते असे नाही.. जे मिळाले नाही त्याचे फार वाईट वाटून घेऊ नका.. जे मिळाले त्याविषयी कृतज्ञता ठेवा.. आयुष्याबद्दल फारसा विचार न करता आयुष्य फक्त आनंदाने जगा.. माऊलीजी

असलेल्या गोष्टींमध्ये रमता आलं, त्याचा आनंद घेता आला की नसलेल्या गोष्टींमुळे नाराज राहत नाही, त्याची हुरहूर लागत नाही माऊलीजी

इतरांच्या वागण्यामुळे तुमची आंतरिक शांती नष्ट होऊ देऊ नका.. माऊलीजी

कोणीही साथ दिली नाही तरीही एकट्यानेच इतिहास घडवा.. तुम्ही माऊलींचे साधक आहात संकटाला हिंमतीने अडवा
माऊलीजी

निसर्ग कुणाचे वाईट करत नाही, पण जो दुसऱ्याचे वाईट करतो, निसर्ग त्याला, त्याने केलेले कर्म सव्याज परत देतो. माऊलीजी

नशीबही हरायला तयार आहे, फक्त तुमची मानसिकता जिंकण्याची हवी
माऊलीजी

खूप सोपं आहे…!
“विषय” तिथेच सोडून द्यावा जिथे स्वतःला “त्रास” होणे सुरू होतं..
समजलं…? माऊलीजी

एक दिवस मिळेलच तुम्हाला,तुमच्या हक्काचे सर्व काही, तोपर्यंत फक्त चालत रहा..! रस्ता सोपा नसेल तरीही, हिम्मत मात्र हारु नका..! माऊलीजी

तुम्हाला तुमचा आळस सोडावाच लागेल.! तरच जीवनात काहीतरी होऊ शकेल..! माऊलीजी

आनंदाच्या भरात “वचन” देऊ नका रागाच्या भरात “प्रतिक्रिया” देऊ नका दुःखाच्या भरात “निर्णय” घेऊ नका माऊलीजी

माणसाचं मन मोठं असायला हवं दिखाव्याचा मोठेपणा जास्त दिवस टिकत नाही – माऊलीजी

वेळ, विश्वास आणि सन्मान हे तीन असे पक्षी आहेत की एकदा उडून गेले की पुन्हा परत येत नाहीत.. जागृकतेने जगा…! – माऊलीजी

एकत्र आलं की सुरुवात होते, सोबत राहिलं की प्रगती होते आणि एकत्र काम केलं की लवकर यश मिळते. – माऊलीजी

तुमचा कठीण काळ चालू असेल तर भरपूर मेहनत करा आणि तुमचा चांगला काळ चालू असेल तर ज्यांचा कठीण काळ आहे त्यांना मदत करा – माऊलीजी

जगताना इतकं सुंदर जगा की मरताना काही जगायचं राहिलं असं वाटलं नाही पाहिजे – माऊलीजी

वस्तूंनी तुमचा त्याग करण्याआधीच तुम्ही मनाने वस्तूंचा त्याग करा, समाधानी राहा – माऊलीजी

नुसती इच्छा असून काही होत नाही. जे इच्छिले ते प्राप्त करण्यासाठी खूप कष्ट, संघर्ष, प्रयत्न, यश-अपयश पचविण्याची तयारी व सातत्य हवे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवो – माऊलीजी

मन शांत ठेवा होईल सर्व ठीक
रिलॅक्स राहा मागचा व पुढचा विचार सोडा – माऊलीजी

असे व्हायला नको होते असा विचार करत रडत बसण्यापेक्षा आता जे झाले त्यावर पुढे काय करायला पाहिजे असा विचार तुम्हाला त्या परिस्थितीतून नक्कीच बाहेर आणतो – माऊलीजी

ज्या दिवशी तुम्हाला स्वतःची किंमत कळेल.. त्या दिवशी दुसऱ्याने तुमची केलेली स्तुती आणि निंदा.. याचा तुम्हाला फारसा फरक पडणार नाही.. – माऊलीजी

आयुष्य एवढेही अवघड नाही जेवढे आपण समजतो बस.. आपली आयुष्याबद्दल ची ‘समज” योग्य व सकारात्मक हवी – माऊलीजी

आयुष्य एवढेही अवघड नाही जेवढे आपण समजतो बस.. आपली आयुष्याबद्दल ची ‘समज” योग्य व सकारात्मक हवी – माऊलीजी

तुमचा कठीण काळ चालू असेल तर भरपूर मेहनत करा आणि तुमचा चांगला काळ चालू असेल तर ज्यांचा कठीण काळ आहे त्यांना मदत करा – माऊलीजी

समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात. म्हणून नेहमी मनाने सकारात्मक रहा, वाईट काळातही चांगले कार्य करत रहा, तेच तुम्हाला त्यातून बाहेर काढणार आहे. – माऊलीजी

रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो की प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना एका क्षणात संपवुन टाकतो. – माऊलीजी

समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजुन घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. – माऊलीजी

क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात. – माऊलीजी

सुखासाठी कधी हसावं लागंत तर कधी रडावं लागतं कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं. – माऊलीजी

आनंद नेहमी चंदना सारखा असतो दुसऱ्यांच्या कपाळावर लावा आपलीही बोटे सुगंधित करून जातो. – माऊलीजी

कठीण काळ कायम टिकाऊ नसतो पण कठीण लोक असतात.
– माऊलीजी

अहंकारात सर्वात वाईट गोष्ट हि आहे कि, अहंकार तुम्हाला हे कधीच जाणवू देत नाही कि तुम्ही चुकीचे आहात… – माऊलीजी

जर माणसाला गलिच्छ आणि घाणेरडे कपडे घालायची लाज वाटते तर गलिच्छ आणि घाणेरड्या विचारांची लाज का वाटू नये ? – माऊलीजी

अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा जी व्यक्ती आपल्या अंतकरणातील 3 गोष्टी ओळखेल- हसण्यामगील दुःख, रागवण्या मागील प्रेम आणि शांत रहाण्यामागील कारण. माऊलीजी

चमत्कार हे नेहमी मेहनत करणान्या माणसाच्या आयुष्यात होतात. – माऊलीजी

कौतुक हा शब्द खुप छोटा आहे पण ते करायला मन मात्र खुप मोठं लागतं. – माऊलीजी

परिस्थिती सुधारण्यासाठी कृती सुधारा.
– माऊलीजी

कठीण वेळ जास्त काळ टिकत नाही, पण कणखर माणसं शेवटपर्यंत टिकतात. – माऊलीजी

क्रोध करून त्या सर्व गोष्टी गमावू नका
ज्या तुम्ही शांत राहून कमावलेल्या आहेत.. माऊलीजी

तुम्ही आर्थिकदृष्ट्या गरीब असलात तरी हरकत नाही, पण मानसिकतेने गरीब राहू नका. – माऊलीजी

प्रत्येक सकाळ मनुष्याला एक सुवर्णसंधी देते, अन् प्रत्येक संध्याकाळ
विचारते, तु त्या संधीचे काय केले. – माऊलीजी

दिवा जरी सूर्याची बरोबरी करू शकत नसला, तरी अंधारात त्याचे महत्त्व सूर्याइतकेच आहे. त्यामुळे स्वतःला कधीही कुठेही कमी समजू नका.– माऊलीजी

आपण सर्व काही करू शकत नाही हे खरेच. पण एखादी गोष्ट जमणारच नाही असे म्हणून त्यापासून दूर पळणे योग्य नाही, किमान एकदा तरी प्रयत्न करून पाहायला हवा…– माऊलीजी

काही वेळा स्वतःला प्रेरित करण्यासाठी फक्त तीनच शब्दांची गरज असते. ‘हो, मी करू शकतो.’ शुभ सकाळ माझ्या प्रिय साधकांनो – माऊलीजी

हातावरील रेषापेक्षा, कष्ट करून, समाधानी राहून, संकटांना सामोरे जाऊन कपाळावरील घामात भविष्य शोधल्यास कपाळावर हात मारण्याची वेळ येत नाही… कधीच हिम्मत हरू नका. – माऊलीजी

चांगले विचार, चांगली भावना आणि चांगले आचरण हीच आयुष्याची खरी संपत्ती आहे. – माऊलीजी

माणसाला किती आयुष्य मिळणार आहे, कधी मृत्यू येणार आहे हा नशिबाचा भाग असतो. पण लोकांच्या मनामध्ये जिवंत रहाणे हा कर्माचा भाग असतो.– माऊलीजी

योग्य व्यक्तीसमोर व्यक्त होणं आणि अयोग्य व्यक्तीपुढे गप्प रहाणे म्हणजे येणाऱ्या संकटांना दूर ठेवण्यासारखे आहे. – माऊलीजी

जगातील सर्व विचारी डोक्यांपेक्षा एक प्रेमळ अंतकरण श्रेष्ठ असते. – माऊलीजी

मनाची शांतता म्हणजे सुखी जीवन आहे. – माऊलीजी

गरजेच्या वेळी उपयोगी पडतो तोच खरा मित्र. – माऊलीजी

वादळात शांत रहा. हाव सोडली की मोह संपतो आणि मोह संपाला की दुःख संपते. – माऊलीजी

निश्चयी भिकारी हा अनिश्चयी सम्राटापेक्षा कितीतरी श्रेष्ठ असतो.
– माऊलीजी

कामात इतकेही अडकू नका,जीवनाला आनंदाने जगुन घ्या. सत्य तर हेच आहे की एक दिवस तुमच्याच कार्यक्रमात तुमची गैरहजेरी असेल – माऊलीजी

जिथे तुम्हाला मान नाही, सन्मान नाही, इज्जत नाही, अशा ठिकाणी पुन्हा कधीही जाऊ नका. – माऊलीजी

मी प्रेम आहे, तर या विश्वातील सर्व लोक माझे मित्र आहेत. मी द्वेष आहे, तर परमात्मा सुद्धा माझा शत्रू आहे. – माऊलीजी

पोटात गेलेलं विष एकाच माणसाला मारतं, कानात गेलेलं विष शेकडो नाती बरबाद करतं. – माऊलीजी

स्वतःचे मन जिंकणे हे हजारो युद्ध जिंकण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे.
– माऊलीजी

किंमत पैशाला कधीच नसते, किंमत पैसे कमवताना केलेल्या कष्टाला असते.
– माऊलीजी

मनुष्य जितका आजाराने थकत नाही, त्यापेक्षा जास्त अतीविचाराने थकतो. म्हणून अतिविचार टाळा आणि हसत राहा. – माऊलीजी

जीवनात चांगले दिवस आणण्यासाठी वाईट दिवसांशी लढावे लागते.
– माऊलीजी

मनुष्याने समुद्राप्रमाणे असावं, भरतीचा माज नाही अन् ओहोटीची लाज नाही तरीही अथांग..!
– माऊलीजी

संधी शिवाय कार्यक्षमतेला किंमत नाही. आणि प्रत्येक दिवस म्हणजे देवाने आपल्याला जगण्यासाठी दिलेली संधी.. तेव्हा सकाळची सुरुवात देवाचे आभार मानून करा चेहऱ्यावर मोठे स्मितहास्य ठेवा दिवसभर आनंदी राहा – माऊलीजी
दिवसाची सकारात्मक सुरुवात!
सकाळची साधना
दररोज सकाळी ५:३८ ते ७:३० या वेळेत व्यायाम करा
प्राणायाम, ध्यान आणि योगामुळे तणाव कमी होतो, आरोग्य सुधारते आणि आत्मविश्वास वाढतो.