Official Website Of Maulijee – Dnyanyog Pratishthan, Chaitanyavan

भजनमाला

भजनमाला

काहीतरी मिळवून ‘कुणीतरी’ असण्याचा आनंद आपण घेतला असेल कधीतरी…

पण आपल्याकडे काहीच नसताना देखील

‘शून्य’ होण्याचा आनंद मिळतो तो केवळ भजनातूनच….

सर्वजण एकत्र येऊन भजन म्हणणे म्हणजे एक स्वर्गसुखाचा सोहळा होय

सामूहिक भजनाने आनंदाचा महापूर येतो…

समर्पणवृत्ति, प्रेम आपोआपच वाढते.

घरात चार लोक असतात पण ते वेगवेगळे

विचार करतात. मात्र शांत लोक एकत्र येऊन भजन म्हणत असतील तर ते सर्व एका वेळी एकच विचार करत असतात…

यातून एक नवी संघटन शक्ति वाढीस लागते.

आपल्याला भजनाची व्याख्या बदलायची आहे.

अनेकांना असे वाटते की भजन म्हाताऱ्या लोकांनी म्हणायला हवे पण असे नाही.

खरं तर भजन तरुणांनी म्हणायला हवे…

भजनातून ‘नवनिर्मिती’ होते. आत्मविश्वास वाढतो, मन उल्हासित होते.

भजन कुठल्या धर्माचे नसते, पण तुमच्या धर्मापर्यंत पोहोचवते.

भजन देवाचे नसते पण देवापर्यंत पोहचवते.

….माऊलीजी

Category:
Scroll to Top