केनियाचा जगप्रसिद्ध धावपटू अबेल मुताई ऑलिम्पिक शर्यतीच्या अंतिम फेरीत होता. तो अंतिम रेषेपासून फक्त काही मीटर दूर होता. त्याचे सर्व प्रतिस्पर्धी मागे होते, आणि त्याचे सुवर्णपदक जिंकणे निश्चित होते. संपूर्ण प्रेक्षक त्याच्या नावाचा जयघोष करत होते.
मात्र, एका गैरसमजातून अबेलने अंतिम रेषा ओलांडली आहे असे समजून, तो खरी रेषा येण्याच्या एक मीटर आधीच थांबला.
स्पेनचा धावपटू इव्हान फर्नांडीस, जो त्याच्या मागे होता, त्याने हे लक्षात घेतले. त्याने अबेलला पुढे जाण्यासाठी जोरात हाक दिली, पण अबेलला स्पॅनिश समजत नसल्याने तो जागेवरच राहिला. तेव्हा इव्हानने त्याला हलकसं ढकललं आणि अंतिम रेषेपर्यंत पोहोचवलं. परिणामी, अबेल पहिला आला आणि इव्हान दुसरा.
शर्यतीनंतर पत्रकारांनी इव्हानला विचारलं,
“तू असं का केलंस? तुला जिंकण्याची संधी होती!”
इव्हान उत्तरला,
“माझं स्वप्न आहे की, एक दिवस आपण अशी मानवजात होऊ जी एकमेकांना मदत करेल. मी पहिला क्रमांक गमावला नाही, मी फक्त योग्य गोष्ट केली.”
पत्रकार पुन्हा म्हणाला,
“पण तू केनियन स्पर्धकाला पुढे आणलं!”
इव्हान हसत म्हणाला,
“तो पहिलाच आलेला होता. ही शर्यत त्याची होती!”
पत्रकाराने पुन्हा विचारलं,
“पण तू सुवर्णपदक जिंकू शकला असतास!”
यावर इव्हान म्हणाला,
“त्या जिंकण्याला काय अर्थ होता? माझ्या मेडलला सन्मान मिळाला नसता. माझी आई काय म्हणाली असती? मूल्यं पिढ्यान् पिढ्या पुढे जातात. मी पुढच्या पिढ्यांना काय शिकवलं असतं? दुसऱ्यांच्या अज्ञानाचा किंवा कमकुवतपणाचा फायदा घेऊ नये, तर त्यांना मदत करावी—हीच शिकवण माझ्या आईने मला दिली आहे.”
धन्य ती माऊली आणि धन्य तिचं लेकरू! 🙏👏🌹

