
निसर्गोपचार शिबिर
हे शिबीर म्हणजे निसर्गाच्या सहवासात शरीर, मन आणि आत्मा शुद्ध करण्याचा एक सुंदर अनुभव आहे.
इथे निसर्गोपचार आणि आहारशुद्धी याच्या माध्यमातून शरीरातली घाण आणि विषारी द्रव्यं बाहेर टाकली जातात. यामुळे शरीर हलकं, मन शांत आणि आरोग्य सुधारलेलं जाणवतं.
- या शिबिरात खालील शुद्धी क्रियांचा सराव केला जातो:
- 🌀 वमन – पचनतंत्र शुद्ध करण्यासाठी उलटीद्वारे शुद्धी
- 👁 डोळ्यांची शुद्धी – नेत्रदृष्टी सुधारण्यासाठी
- 🌊 जलनेती – श्वसनमार्ग शुद्ध करणं
- 💧 एनिमा – आतड्यांची स्वच्छता
माऊलीजींच्या सान्निध्यात साधकांना एक वेगळाच आनंदाचा झरा सापडतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली फक्त शरीर नाही तर मन आणि आत्माही आरोग्यवान होतो.
ही केवळ उपचारशिबिर नसून, एका नव्या, आरोग्यदायी आणि आनंददायी जीवनशैलीची सुरुवात आहे! ✨
टिपणी : हे शिबीर फक्त त्याच साधकांसाठी आहे ज्यांनी निवासी साधना शिबिर पूर्ण केलेलं आहे.
दिवसाची सकारात्मक सुरुवात!
सकाळची साधना
दररोज सकाळी ५:३८ ते ७:३० या वेळेत व्यायाम करा
प्राणायाम, ध्यान आणि योगामुळे तणाव कमी होतो, आरोग्य सुधारते आणि आत्मविश्वास वाढतो.