Official Website Of Maulijee – Dnyanyog Pratishthan, Chaitanyavan

मी कसा आहे?

तुम्ही स्वतःला लोकांच्या नजरेतून पाहत असाल तर 

तुमची स्वतःची सुद्धा स्वतःशी नीट ओळख होणार नाही..

तुमच्यातील गुण देखील तुम्ही पाहू शकणार नाहीत.. लोकांनी काही वाईट बोलले तर तुम्ही नाराज होणार,

कोणी चांगले बोलले तर तात्पुरते समाधानी होणार..

म्हणजे तुमच्या जीवनाचा कंट्रोल तुम्ही त्यांच्या हातात दिला..

तुम्हाला स्वतःला माहित आहे ना, की तुम्ही कसे आहात मग यापुढे 

कोणाच्याही वाईट बोलण्याचा नकारात्मक परिणाम तुमच्यावर होऊ देऊ नका..

तुम्ही फक्त तुमचे काम मनापासून करत राहा..

त्या कामाचा आनंद घ्या..

जीवनात तणाव न घेता आनंदात जगा..

लोकांसाठी मी कसा..?

ज्याने मला ज्या चष्म्यातून पाहिला तसा…!

मी आता नाराज राहणार नाही..

मी माझे जीवन भरभरून जगणार..

माऊलीजी😊

Scroll to Top