एका वया नंतर जीवनाने आपल्याला खूप काही शिकवलेले असते..
अनुभवातून तावून सुलाखून निघाल्यानंतर आपल्याला काही गोष्टींचे काहीच वाटेनासे होते.
नेहमी छोट्या छोट्या गोष्टींची तक्रार करणारे आपण,
खूप वाईट घडले तरीही प्रतिक्रिया न देता जगायला शिकतो..
आपल्याला आपले दुःख आणि अडचणीही कुणाला सांगाव्याशा वाटत नाही..
आपण जीवनात एवढं सहन केलेलं असतं की वेदनेची धारही बोथट होऊन जाते..
दुःखाच्या वाटेवरून चालताना आपण एवढे पक्के होऊन जातो की
आधी अपेक्षेत, इच्छांमध्ये व दुःखात अडकलेलं मन आपसूकच त्यातून मुक्त होतं..
हजार मोठे मोठे घाव सोसलेल्या मनाला एका छोट्या जखमेचे काय वाटणार हो..!
जेव्हा तुम्ही मनाने पक्के होता तेव्हा तुम्ही दुःखाच्या पलीकडे जाता..
आणि एकदा का तुम्ही दुःखाच्या पलीकडे गेला की तुमची नैया आपोआपच पार होते..
तुम्ही मजबूत बनता..
अधिक सक्षम होता..
आणि मग तेव्हा कळतं की जीवनाने दिलेले प्रत्येक दुःख आपल्याला अजून जास्त मजबूत बनवण्यासाठी होते..
जेव्हा हे कळतं तेव्हा दुःखातही हसत हसत जगण्याची कला तुम्ही आपसूकच शिकता..
माऊलीजी 😊

