
ध्यान शिबिर
ज्ञानयोग ध्यान शिबीर – अंतर्मनाच्या शांततेकडे नेणारा प्रवास
ध्यान म्हणजे फक्त डोळे मिटून बसणं नाही, तर प्रत्येक क्षणात पूर्णपणे जागरूक राहण्याची अवस्था – क्षणोक्षणीची सजगता. या शिबिरात विविध ध्यानपद्धतींचा सराव आणि अनुभव घेताना साधक हळूहळू स्वतःच्या अंतर्मनाशी जोडले जातात. मन शांत होतं, विचार स्थिर होतात आणि साक्षीभाव निर्माण होतो – जिथे आपण गोष्टी घडताना फक्त पाहतो, त्यात अडकत नाही.
या शिबिरात मौनाचं सामर्थ्य अनुभवायला मिळतं. चैतन्य वनाजवळील डोंगर चढाई आणि निसर्गाच्या सानिध्यात ध्यान याद्वारे मन मोकळं होतं आणि आत्म्याशी नातं गहिरं होतं. ध्यान, मौन आणि निसर्ग यांचा त्रिवेणी संगम साधकांना एक अशा शांततेकडे घेऊन जातो, जिथे खऱ्या अर्थानं ‘स्वतःला’ भेटता येतं. हे ध्यान शिबिर म्हणजे आतल्या गोंधळातून बाहेर पडण्याचा, स्थिरतेकडे जाण्याचा आणि आत्मिक आनंद मिळवण्याचा एक सुंदर प्रवास आहे.
टिपणी : हे शिबीर फक्त त्याच साधकांसाठी आहे ज्यांनी निवासी साधना शिबिर पूर्ण केलेलं आहे.
दिवसाची सकारात्मक सुरुवात!
सकाळची साधना
दररोज सकाळी ५:३८ ते ७:३० या वेळेत व्यायाम करा
प्राणायाम, ध्यान आणि योगामुळे तणाव कमी होतो, आरोग्य सुधारते आणि आत्मविश्वास वाढतो.