चैतन्यवन..
जेथे आनंद, आध्यात्मिक उन्नती, सकारात्मक ऊर्जा, समाधान आणि मनःशाती हे सगळ एकत्र अनुभवायला मिळत,
अस पवित्र, शांत आणि प्रेरणादायी ठिकाण म्हणजेच चैतन्यवन… जिथे आत्म्याला विश्रांती आणि मनाला नवी दिशा मिळते
- जात-धर्माच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याचे कार्य चैतन्य वन व ज्ञानयोग निस्वार्थ भावनेने करत आहे
- येथे आल्यावर पद, प्रतिष्ठा आणि अहंकार विसरून माणूस स्वतःच्या मूळ रूपात येतो. मनातील द्वंद्व संपते आणि आत्मशोधाचा प्रवास सुरू होतो. येथे साधकांना मिळणारी ऊर्जा, प्रेम आणि आत्मिक समाधान शब्दांत सांगता येणार नाही—ते केवळ अनुभवल्यावरच कळेल!
- चैतन्य वनात एकदा आलात की परत यायची ओढ लागते!

नावाप्रमाणेच चैतन्य निर्माण करणारे हे वन एकदा येथे येऊन गेले की परत येण्याची ओढ लागते—हे अनुभवल्या शिवाय कसे कळणार?
चैतन्य वनात तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे!

स्वतःला शोधण्याचे स्थान
ज्ञानयोगाच्या सर्व साधकांसाठी चैतन्य वन म्हणजे स्वतःला ओळखण्यासाठीचा आरसा आहे. येथे होणाऱ्या विविध शिबिरांच्या माध्यमातून आपण स्वतःला पाहायला लागतो, दोषारोप करण्याऐवजी स्वतःमध्ये सकारात्मक परिवर्तन करून जीवन बदलण्याचा अनुभव घेतो. कोणतेही थोतांड नाही, कोणतेही अवडंबर नाही – फक्त हसत-खेळत जीवनाला नवसंजीवनी देण्याचे कार्य येथे ज्ञानयोगाच्या माध्यमातून माऊलीजी व साधक करत आहेत.
जीवनाला दिशा देणाऱ्या अनुभूती
ध्यान, प्राणायाम, नैसर्गिक उपचार, डोंगर चढाई, स्वत:शी संवाद, भजन, खेळ, नृत्य, स्वतःची ओळख, शरीर शुद्धी, आहारशास्त्र – या विविध प्रक्रियांमधून येथे साधकांना आरोग्य, आनंद आणि जीवन समृद्ध करण्याचा अनुभव मिळतो. मनाची पवित्रता एवढी वाढते की देव फक्त मंदिरात नसून तो स्वतःमध्ये आणि प्रत्येकात आहे, याची अनुभूती येते.
कुटुंबसंस्था मजबूत करणारे मार्गदर्शन
माऊलीजींच्या प्रेरणेमुळे हजारो कुटुंबांतील वाद संपले आहेत, कुटुंबातील सर्वजण प्रेमाने एकत्र आले आहेत. मनामनातील भिंती नाहीशा होऊन प्रेममय कुटुंब तयार झाले आहे. हजारो साधक ज्ञानयोगाच्या माध्यमातून चैतन्य वनात येऊन व्यसनमुक्त आणि व्याधिमुक्त जीवन जगत आहेत.
निसर्गरम्य वातावरण आणि शुद्ध ऊर्जा
“वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती…”
या संत तुकारामांच्या ओळींचा जिवंत अनुभव चैतन्य वनात येतो.
चैतन्य वन इथे समृद्ध वृक्षसंपदा आणि अनेक रंगबिरंगी पक्ष्यांच्या सान्निध्यात मनाला शांती मिळते.
• विविध प्रकारचे औषधी व दुर्मिळ वृक्ष.
• नैसर्गिक वातावरणात मुक्तपणे संचारणारे पक्षी
• निसर्गाशी एकरूप होणारी शांतता व शुद्ध हवा.
लाखो साधकांच्या अखंड साधनेमुळे या स्थळी पवित्र, प्रसन्न आणि मंगलमय ऊर्जा निर्माण झाली आहे.
येथे पाऊल ठेवताच मातीतील सकारात्मक ऊर्जा आणि अंतर्मनातील शांतीचा अनुभव आपोआप होतो.
“मिट्टी, पानी, धूप, हवा — सभी रोगों की एक दवा” — हेच खरे आरोग्याचे मूळ स्रोत आहेत.
चैतन्य वनातील सुविधांबद्दल माहिती
साधकांसाठी राहण्याची सुविध
महिला आणि पुरुष साधकांसाठी स्वतंत्र हॉल, स्नानगृह व स्वच्छतागृह उपलब्ध आहेत.
जलसाठा आणि शेततळे
डोंगरातून वाहणारे आणि पावसाचे पाणी साठवून तयार केलेला जलसाठा
पार्किंग क्षेत्र
मेन गेटसमोर विस्तीर्ण पार्किंगची सुविधा



चैतन्य वनातील आकर्षक स्थळे:





गुरुजन
दिवसाची सकारात्मक सुरुवात!
सकाळची साधना
दररोज सकाळी ५:३८ ते ७:३० या वेळेत व्यायाम करा
प्राणायाम, ध्यान आणि योगामुळे तणाव कमी होतो, आरोग्य सुधारते आणि आत्मविश्वास वाढतो.