भीती माणसाची शक्ती कमी करते..
माझे कसे होईल अशी चिंता करून चांगले होईल का हो?
तुम्हीच विचार करा..
जे व्हायचे ते होतेच..
आपण छान आनंदात वर्तमानात राहून आपले काम करत राहायचे..
एवढा काय विचार करता हो?
आजपर्यंत एवढ्या वेळा संकट आले
झालो ना त्यातून आपण पार..
यातूनही नक्की मार्ग निघेल, छानच होईल..
आजपासून ही चेहरा उतरवून बसायची व भविष्याची चिंता करत बसायची सवय लगेच सोडा..
डोकं रिलॅक्स राहील..
मन शांत राहील..
काय म्हणतोय मी?
कळते आहे का?
मग वाचून सोडून देऊ नका..
लगेच श्वासाला पहा चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवा आणि स्वतःला सांगा की मी चिंता सोडली आहे, आता मस्त जगणार आहे..
माऊलीजी😊

