
बाल शिबिर
इथे शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकांपुरतं मर्यादित नाही, तर मुलांचं मन, शरीर आणि विचारांचा सर्वांगीण विकास करण्याचा एक सुंदर प्रवास आहे.
मुलं मातीमध्ये खेळतात,इथे ते स्वतःला ओळखायला शिकतात, शांत श्वासांमध्ये हरवून प्राणायामातून मनाला स्थैर्य देतात.
सोशल मीडियाचा विचारपूर्वक आणि जबाबदारीने वापर कसा करायचा हे शिकतात. आहाराकडे केवळ पोट भरण्यासाठी नव्हे, तर तो एक ‘प्रसाद’ म्हणून पाहायला शिकतात – कृतज्ञतेने आणि जागरूकतेने. मैदानात खेळताना मुलं नेतृत्वगुण, टीमवर्क आणि स्वावलंबन अनुभवतात – जिथे हार-जीतपेक्षा सहभागी होणं महत्त्वाचं असतं.
आकाशदर्शनाद्वारे मुलांना ताऱ्यांची व राशींची खरी ओळख होते. त्यामागचं विज्ञान, हालचाली, ग्रह-नक्षत्र यांची माहिती मिळते. त्यांचं कुतूहल, निरीक्षणशक्ती आणि कल्पनाशक्ती बहरते. अंधश्रद्धेपेक्षा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होतो आणि खगोलशास्त्राविषयी जिज्ञासा निर्माण होते.
ट्रेकिंगद्वारे निसर्गाशी घट्ट मैत्री जडते, आई-बाबांचं प्रेम आणि त्यांचं मोल समजतं. व्यसनांपासून दूर राहण्याचं भान, आणि जीवनात सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवायचा याचं बाळकडू मिळतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, इथे देवत्वाचा अनुभव मिळतो – प्रेमळ माऊलींच्या सान्निध्यात!
हे शिक्षण म्हणजे केवळ शाळा नाही, तर जीवन जगायला शिकवणारं एक प्रेमळ, आनंददायी आणि संस्कारक्षम वातावरण आहे – जिथे प्रत्येक क्षण शिकल्यानं आणि अनुभवानं भरलेला असतो.
दिवसाची सकारात्मक सुरुवात!
सकाळची साधना
दररोज सकाळी ५:३८ ते ७:३० या वेळेत व्यायाम करा
प्राणायाम, ध्यान आणि योगामुळे तणाव कमी होतो, आरोग्य सुधारते आणि आत्मविश्वास वाढतो.