Official Website Of Maulijee – Dnyanyog Pratishthan, Chaitanyavan

सत्संगाचा अनुभव कशाला म्हणतात?

सत्संगाचा अनुभव घेणे म्हणजे,

माऊली बोलताना आपल्या मनाचा प्रवास शब्दांसोबत कसा होतो हे जागरूकपणे पाहणे… विचार.. भावना.. मनस्थिती.. जाणीव.. यांचा स्थिरतेचा, शून्यवस्थेचा प्रवास..!

एक एक शब्द कानावर पडताना, मी स्वतःशी संवाद साधतो.. आतून बदलतोय.. शांत होतोय.. ऊर्जेसोबात जोडल्या जातोय.. स्वतःला विसरतो आहे.. आणि माझ्या गुरूच्या पाऊलवाटे वर जायला तयार आहे..

आतून आनंदाचा, शांततेचा, देवत्वाचा, गुरुतत्वाचा प्रवाह वाहतोय, आणि मी त्या अनुभवाच्या प्रवाहात वाहतोय.. शांतपणे..

सर्वात शेवटी राहते ती फक्त अनुभूती.. शांतता.. आनंद..

मी संपतो.. परमात्माच उरतो.. आणि यातून माउलींना हवा तसा बदल माझ्यात आपोआप घडतो..

मी घडवल्या जातोय गुरूकडून..!

सत्संग हे फक्त माध्यम आहे.. आणि माझ्यातील सकारात्मक बदलाने माझी अध्यात्मिक, आत्मिक प्रगती होते आहे..

मी विचाराने संपन्न होतो आहे, आतून शांत होतो आहे.. प्रेमाने भरतो आहे.. विश्वात्मक भाव माझ्यात दिसतोय.. मी आणि माऊली एकच आहे..

हे माझ्या गुरूंच्या डोळ्यात मला दिसते आहे.. याला सत्संगाचा अनुभव असे म्हणतात..

माऊलीजी😊

Scroll to Top