
निवासी शिबिर
🌿 ज्ञानयोग निवासी शिबीर – आनंद, आरोग्य आणि आत्मशांतीचा अनुभव 🌿
जीवनातले असंख्य प्रश्न… आणि त्यांचं एकच उत्तर – ज्ञानयोग.
मनःशांती, समाधान, आत्मिक आनंद, उत्तम आरोग्य आणि प्रेमाने भरलेलं जीवन – हे सगळं इथे अनुभवायला मिळतं.
चैतन्य वनात माऊलीजींच्या सान्निध्यात घालवलेले सहा दिवस म्हणजे जगण्याची नवी दिशा.
इथे साधक वय, पद, ताणतणाव, आजार… सगळं विसरतो – उरतो फक्त परमेश्वराचा स्पर्श आणि चैतन्याचा नितळ अनुभव.
प्रत्येक दिवस ध्यान, प्राणायाम, निसर्गात रमणं, शरीरशुद्धी, गाणं, नाचणं, हसणं-रडणं याने भरलेला असतो.
मन हलकं होतं, शरीर सशक्त होतं आणि आत्मा परमात्म्याशी जोडला जातो.
आकाशदर्शनाद्वारे ताऱ्यांची व राशींची खरी ओळख होते. त्यामागचं विज्ञान, हालचाली, ग्रह-नक्षत्र यांची माहिती मिळते. अंधश्रद्धेपेक्षा विज्ञान आणि खगोलज्ञानाची जाणीव निर्माण होते.
- या शिबिरात साधकांना जाणवतं की —
- औषधांशिवायही आरोग्य टिकवता येतं
- मनात आनंद असेल तर प्रत्येकाशी संवाद सहज होतो
- नातेसंबंध प्रेमळ होतात, घराचं गोकुळ होतं
- आणि देव कुठेतरी लांब नाही, तो आपल्या आतच असतो
माऊलींच्या प्रेमळ, वात्सल्यपूर्ण उपस्थितीत आपण खरंखुरं बालपण पुन्हा जगतो.
हे फक्त शिबिर नाही… हा एक आत्मशुद्धीचा प्रवास आहे
दिवसाची सकारात्मक सुरुवात!
सकाळची साधना
दररोज सकाळी ५:३८ ते ७:३० या वेळेत व्यायाम करा
प्राणायाम, ध्यान आणि योगामुळे तणाव कमी होतो, आरोग्य सुधारते आणि आत्मविश्वास वाढतो.