जीवनातले असंख्य प्रश्न… आणि त्याचं एकच उत्तर – ज्ञानयोग.
मनःशांती, समाधान, आत्मिक आनंद, उत्तम आरोग्य आणि प्रेमाने भरलेलं जीवन – हे सगळं इथे अनुभवायला मिळतं.
चैतन्य वनात माऊलीजींच्या सान्निध्यात घालवलेले सहा दिवस म्हणजे जगण्याची नवी दिशा. इथे साधक वय, पद, ताणतणाव, आजार… सगळं विसरतो – उरतो फक्त परमेश्वराचा स्पर्श आणि चैतन्याचा नितळ अनुभव.
माऊलींच्या प्रेमळ, वात्सल्यपूर्ण उपस्थितीत आपण खरंखुरं बालपण पुन्हा जगतो. हे फक्त शिबिर नाही… हा एक आत्मशुद्धीचा प्रवास आहे
ज्ञानयोग डोंगर चढाई – निसर्ग, साधना आणि प्रेरणेचा अद्भुत संगम वर्षातून दोनदा – पावसाळ्यात (ऑगस्ट) आणि हिवाळ्यात (डिसेंबर- जानेवारी) – माऊलीजींच्या सान्निध्यात साधक चार दिवसांची डोंगर
ज्ञानयोग डोंगर चढाई – निसर्ग, साधना आणि प्रेरणेचा अद्भुत संगम वर्षातून दोनदा – पावसाळ्यात (ऑगस्ट) आणि हिवाळ्यात (डिसेंबर- जानेवारी) – माऊलीजींच्या सान्निध्यात साधक चार दिवसांची डोंगर
ध्यान म्हणजे फक्त डोळे मिटून बसणं नाही, तर प्रत्येक क्षणात पूर्णपणे जागरूक राहण्याची अवस्था – क्षणोक्षणीची सजगता. या शिबिरात विविध ध्यानपद्धतींचा सराव आणि अनुभव घेताना साधक हळूहळू स्वतःच्या अंतरमनाशी जोडले जातात. मन शांत होतं, विचार स्थिर होतात आणि साक्षीभाव निर्माण होतो – जिथे आपण गोष्टी घडताना…
हे शिबीर म्हणजे निसर्गाच्या सहवासात शरीर, मन आणि आत्मा शुद्ध करण्याचा एक सुंदर अनुभव आहे. वमन, डोळ्यांची शुद्धी, एनिमा, जलनेती या नैसर्गिक उपचारांमधून आणि आहारशुद्धी याच्या माध्यमातून शरीरातली घाण आणि विषारी द्रव्यं बाहेर टाकली जातात. यामुळे शरीर हलकं, मन शांत आणि आरोग्य सुधारलेलं जाणवतं.