आनंदाची उधळण,
चैतन्याची बरसात
जीवा-शिवाचे मिलन,
ही ‘ऋतु हिरवा’ ची
खास बात..
ऋतु हिरवा
सहा ऋतूंचे सहा सोहळे, येथ भान हरावे,
या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे
या ओळीप्रमाणे या पुस्तकातील शब्दांतून तुम्हाला जीवन आनंदाने, उत्साहाने व विश्वासाने जगण्याची प्रेरणा मिळेल.
जीवनातील दुःख विसरून, संकटाला हिम्मतीने सामोरे जाण्यासाठी हे पुस्तक तुम्हाला प्रेरित करेल.
प्रत्येक ऋतूंचा रंग वेगळा, भावनांचा गंध आगळा जाणिवेच्या श्रावणधारा, मनात फुलवी जीवनरूपी मळा
विविध ऋतूमध्ये निसर्गाचे रंग जसे बदलतात, तसेच मनाचे रंगही परिस्थितीनुसार बदलत राहतात.
कधी दुःखात जाणवतो ग्रीष्मातील उन्हाळा,
कधी मनातील आशा पल्लवीत होऊन वसंत फुलतो,
कधी मनात प्रेमाची बरसात होतांना वर्षाऋतु अनुभवतो,
तर कधी शिशिरातील हिवाळा जाणवतो.
सुखाच्या रंगात रंगताना मनात हेमंत ऋतु फुलतो.
तर कधी शरद ऋतूतील पावसाळा मनात प्रगटतो.
मनातील ऋतुचक्र बदलत राहते.
पण एक गोष्ट मात्र कधीच बदलत नाही, ती म्हणजे ‘जाणीव’
या जाणीवेमुळे आत अंतर्यामी शांतता, स्थिरता, तृप्तता, समाधान अनुभवता येते.
या पुस्तकातून त्याच जाणिवेची जागृती होऊन जीवन आनंददायी होणार आहे. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होणार आहे.
हे पुस्तक तुमच्या अंतर्यामी ‘आनंदाची जाणीव’ करून देईल.
या जाणीवेच्या प्रवाहात तुमचे सर्व दुःख वाहून जाईल.
सुख, समाधान, शांतता व आत्मविश्वास निर्माण करणारे हे ‘ऋतु हिरवा’ पुस्तक जणू देवाचा प्रसाद आहे.