ज्ञानयोग साधना केल्यावर साधकांच्या जीवनात झालेले खरे बदल
लोकप्रिय अनुभव व्हिडिओ
सर्व पहा
गिरीश गुट्टे – कोपरगाव, भारत
सीमा राव — एल्जिन, इलिनॉय, अमेरिका
संजिव आणि नीलम रेगे — अमेरिका
संतोष मोरे – पुणे, भारत
अक्षय भबुतकर – अमरावती, भारत
अशोक देशपांडे – संभाजीनगर, भारत
किरण सूर्यवंशी – पुणे, भारत
अनुभव वाचा
-
सचिन सुभाष तोतला
जय गुरुदेव माऊलीजी 🚩🙏
मी सचिन सुभाष तोतला,
राहणार – परळी वैजनाथ.मी २००५ साली ज्ञानयोग ध्यान शिबिर केले.
माझे पहिले शिबिर झाल्यापासूनच मी ज्ञानयोगाशी आणि माऊलीजींशी अखंडपणे जोडलेलो आहे.
ज्ञानयोगाशी जोडल्यापासून माझ्या जीवनात अतिशय सकारात्मक व सुंदर परिवर्तन झाले आहे 🌸✨त्या परिवर्तनांपैकी काही अनुभव खालीलप्रमाणे आहेत 👇🏻
👉🏻 माझा स्वतःवरचा आत्मविश्वास (Self Confidence) मोठ्या प्रमाणात वाढला आहे 💪😊
👉🏻 मला जबाबदारीची खरी जाणीव झाली आहे. त्यामुळे मी माझ्या परिवारातील तसेच माझ्या सहवासात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी मनापासून घेतो आणि ती यशस्वीपणे पूर्ण करतो 🤝✅
👉🏻 मी जे कार्य हातात घेतो, ते पूर्ण विश्वासाने आणि शंभर टक्के समर्पणाने पूर्ण करतोच 🌟
👉🏻 ज्ञानयोग ध्यान शिबिर केल्यापासून मी पूर्णपणे निरोगी, आनंदी व समाधानी जीवन जगत आहे 🌿😇
👉🏻 मला माझ्या परमेश्वरावर (माऊलीजींवर) शंभर टक्के अढळ विश्वास आहे.
ते प्रत्येक क्षणी, प्रत्येक श्वासात माझ्यासोबतच आहेत, अशी माझी ठाम भावना आहे 🕉️💖👉🏻 माझा स्वतःचा व्यवसाय आहे.
मी जेव्हा-जेव्हा शिबिरासाठी जातो, तेथून मला पुढील तीन महिन्यांसाठी सकारात्मक ऊर्जा मिळते 🔆
त्या ऊर्जेमुळे मी माझ्या व्यवसायात हसत-खेळत, आनंदाने व समाधानाने खूप चांगली प्रगती केली आहे 📈😄👉🏻 मी रोज सकाळी नियमित साधना करतो आणि रोज ज्ञानयोग गोपाळकाला आहार घेतो🙏🥗
👉🏻 मी माझ्या देवाकडे, माझ्या परमेश्वर माऊलीजीं कडे नेहमी एकच प्रार्थना करतो —
या विश्वातील प्रत्येकाला जे जे काही हवे आहे, ते माझ्याआधी मिळू दे 🌍💫
सर्वांचे आयुष्य आनंदी होऊ दे,
सर्वांचे कल्याण होऊ दे,
आणि सर्वांना ज्ञानयोगाशी जोड 🙏🌼हीच प्रार्थना माझ्या मनातून प्रत्येक क्षणाक्षणाला आपोआप निघत असते 💞
जय गुरुदेव माऊलीजी 🚩🙏
|| जो जे वांछील | तो ते लाहो ||
-
सीमा राव
जयगुरुदेव! मी ज्ञानयोगाचा सुमारे चार वर्षांपासून भाग आहे. गेल्या चार वर्षांत माझ्या आयुष्यात बरेच काही बदलले आहे. ज्ञानयोगाने मला चांगले शारीरिक आरोग्य आणि मानसिक शांती दिली आहे. दररोज पहाटेची साधना (प्राणायाम आणि ध्यानासह व्यायाम); फेसबुक, यूट्यूब आणि झूमवरील वारंवार सत्संगामुळे जीवनातील आव्हाने आणि समस्यांना तोंड देण्यास मदत झाली आहे; स्वीकृती; समर्पण; आत्मविश्वास, शक्ती आणि धैर्य; घरी आणि इतरांशी चांगले संबंध राखणे ही काही उदाहरणे आहेत. माउलीजींचे त्यांच्या शिष्यांबद्दलचे निःशर्त प्रेम आणि आपल्याला मदत करण्यासाठी त्यांची सतत आणि अथक चिकाटी ही खरोखरच दैवी प्रेम आहे जी आपल्याला आपल्या प्रत्येकातील आत्म्याशी जोडते. शेवटी, माउलीजींमध्ये विनोदाची एक अद्भुत भावना आहे आणि त्यांच्यात एका बाळाशी आणि १०० वर्षांच्या प्रौढ व्यक्तीशी सहजतेने संपर्क साधण्याची आणि संवाद साधण्याची क्षमता आहे. धन्यवाद. जयगुरुदेव.
-
अक्षय भबुतकर
माझं नाव अक्षय भबुतकर आहे. मी धामणगाव रेल्वे अमरावती मध्ये राहतो. अनुभव सांगायचं झालं तर मला खूपच जास्त ज्ञानयोग मुळे माझ्या जीवनात बदल झाले. मला माझा व्यवसायात खूप जास्त लॉस होत होता माझ्यामध्ये कॉन्फिडन्स ची खूप जास्त कमी होती आणि मी फक्त माउलीजींचे शिबिर यासाठी जॉईन केली होती की मला माझ्या व्यवसायात प्रगती झाली पाहिजे आणि चांगले मला पैसे कमावता आले पाहिजे. माऊलीजिचे व्हिडिओ मी खूप आधीपासून बघत होतो परंतु निवासी शिबिर मी कधी जॉईन नाही केले. तर विचार मनात आला कि एकदा बघून तर येऊया त्यामुळे बघण्यासाठी फक्त मी ते निवासी शिबिर जॉईन केले आणि माझं जीवन संपूर्ण बदलून गेले. मला माझ्या व्यवसायात जो लॉस होत होता तो लॉस होणे बंद झाल, खरंतर मला सर्व गोष्टी येत होत्या परंतु माझ्यात आत्मविश्वासाची कमी होती त्यामुळे ते काम मी करत नव्हतो हा सर्वात मोठा माझातला फॉल्ट होता तर ज्ञानयोग मुळे आत्मविश्वास वाढला कॉन्फिडन्स वाढला प्रत्येक नवी संधी मी घेत होतो आणि असं करता करता माझा बिझनेस आणखी जास्त वाढला. बिझनेस सोबतच माझ्या काही वाईट सवयी होत्या आणि मला अजिबात सोडायच्या नव्हत्या कारण कोणत्या वाईट सवयी मुळे मला काही तोटा होत नव्हता परंतु माउलींजी सोबत जोडलो आपल्या ज्ञानयोगा सोबत जोडलो त्यामुळे ज्या वाईट सवयी होत्या मी नॉनव्हेज खूप खात होतो चिकन मटन आणि चहा मी दिवसातून पाच ते सहा कप पियायचो आता मला तीन ते चार वर्ष झाले मी चहाला हात सुद्धा लावलेल्या नाही नॉनव्हेज सुद्धा खाल्लेले नाही आणि असा खूप साऱ्या वाईट सवयी माझा एकदम बंद झाल्या. खरंच मित्रांनो एकदा निवासी शिबिर जॉईन करून बघा तुम्हाला एक नवीन अनुभूती येणार जे तुम्ही शब्दात सांगू शकणार नाही. जय गुरुदेव.
-
संजीव रेगे
आमचा ज्ञानयोगाचा परिवर्तनकारी अनुभव आम्ही दोघेही निवृत्त व्यावसायिक असून अमेरिकेत वास्तव्यास आहोत. २०२१ साली आम्ही प्रथम ज्ञानयोगाशी जोडले गेलो. त्यानंतर ऑनलाईन तसेच औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) येथे निवासी शिबिर पूर्ण केले. आज आम्ही दररोज सायंकाळी ८ ते १० या वेळेत (अमेरिका वेळमध्ये) झूम साधना करतो. माऊलीजींच्या दिव्य व ज्ञानयोगाच्या सकारात्मक ऊर्जेमुळे आमच्या जीवनात काही अशक्य गोष्टी शक्य झाल्या.
- अनेक वर्षे माझ्या भावाशी दुरावलेले संबंध पुन्हा अचानक नॉर्मल झाले.
- तसेच आमच्या दोन मोठ्या मुलांमध्ये गेली १० वर्षे असलेला गैरसमजही दूर झाला.
आरोग्याच्या बाबतीतही मोठा चमत्कार घडला —
- मी माझा diabetes reverse केला असून आता कसलेही औषध घेत नाही.
- गॅस्ट्रोपॅरेसिस नावाचा एक कठीण असा पोटाचा आजार मला झाला होता, ज्याला कुठलेही औषध नाही. पण आता माझे रिपोर्ट्स पूर्णपणे नार्मल आहेत. माझे थायरॉईडही लेवल्स गेल्या तीन वर्षांपासून नॉर्मल आहेत.
ज्ञानयोग शिबिर हे फक्त एक शिबिर नाही, तर आत्म्याला स्पर्श करणारा अनुभव आहे. हे आपल्याला पुन्हा स्वतःशी व ईश्वराशी जोडायला, मन-शरीराला नवी ऊर्जा द्यायला आणि जीवनाला नवा अर्थ द्यायला शिकवते. हे आपल्याला पॉज़ घेवून, मन शांत करायला आणि स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणायला प्रेरित करते. आपण अधिक जबाबदार, संवेदनशील आणि प्रेमळ होतो. इनर पीस हवी असेल, उत्तम आरोग्य हवे असेल किंवा दैनंदिन टेन्शन मधून मुक्ती हवी असेल — याचे उत्तर आहे ज्ञानयोग. हे सहा दिवसांचे शिबिर तुम्हाला अधिक शांत, संतुलित आणि आनंदी बनवते. आम्ही मनापासून सांगतो — ज्ञानयोग हे केवळ शिकण्याचे ठिकाण नाही, तर जीवनाला नवी दिशा देणारा प्रकाश आहे..
-
भरत काकडे
माझे नाव भरत काकडे आहे. मी सध्या एम बी बी एस च्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. मी ज्ञानयोग शिबिर सातवी च्या वर्गात असताना माझ्या भावासोबत केले. शिबीर करून खूप भारी वाटल, माझ्या अभ्यासात माझ्या स्टेज करियर मधे खूप छान बदल झाला. मी दहावी पर्यंत खूप सर्वसाधारण विद्यार्थी होतो, परंतु माऊलीजी आणि ज्ञानयोगामुळे मला अभ्यासात एक नवीन प्रेरणा मिळाली आणि आत्मविश्वास आला.मी माऊलीजींना माझे डॉक्टर होण्याचे स्वप्न सांगितले होते. तेव्हा मला माऊलीजींनी एकच गोष्ट सांगितली होती आणि मला ती गोष्ट अजून आठवतेय की “तू १००% प्रयत्न कर, तू डॉक्टर होणारच”. आणि माझ स्वप्न पूर्ण होत आहे. आज मी जे काही आहे ती सर्व माऊलीजी आणि ज्ञानयोगाची कृपा आहे.
ज्ञानयोगामुळे माझ्या वैयक्तिक जीवन मधे तर बदल झालेच, परंतु घरातील वातावरण जणू गोकुळ आणि वृंदावन झाले आहे. प्रत्येकजण एकमेकाला समजून घेऊ लागला. माफ करणे, प्रेमाने वागणे हे सगळं ज्ञानयोगाची देणगी आहे.आत्ताचे बाहेरील वातावरण असे असताना ज्ञानयोग माझ्या सोबत आहे, त्यामुळे मी सर्व व्यसनापासून दूर आहे. आणि याचा मला सार्थ अभिमान आहे. या सर्वांच श्रेय प. पु. माऊलीजी यांच्या चरणी.
-
अशोक नारायण देशपांडे
जय गुरुदेव, मी अशोक नारायण देशपांडे,वय 50, संभाजीनगर येथे राहतो कंपनी मध्ये जॉब करतो ज्ञानयोगात येण्यापूर्वी माझे जीवन खूपच भयंकर होते विस्कळीत होतेवयाच्या 20 व्या वर्षापासून मला तंबाखू गुटखा चहाचे व्यसन जडले होते खूप प्रयत्न केले पण व्यसन काही जात नव्हते. त्यानंतर वयाच्या 35 व्या वर्षी मला शुगर चा त्रास सुरू झाला त्यासाठी मला आयुर्वेदिक आणि ऍलोपॅथी दोन्ही मिळून एकूण सात गोळ्या रोज घेत होतो. गोळ्या घेऊन सुद्धा माझी शुगर लेवल नॉर्मल रहात नव्हती जीवन खूपच असह्य झाले होते. मणक्यात गॅप आल्याने डॉक्टरने मला खाली बसायला नाही सांगितले होते जास्त उभे राहिल्यामुळे मला वेरीकोज व्हेन्स चा त्रास सुरू झाला . माझी अडचण काही केल्या कमी होत नव्हती रात्री झोप येत नव्हती खुप वेदना सुरू झाल्या जीवन नकोसे वाटत होते. जास्त दिवस जगु शकत नाही असेच रोज विचार मनात येत होते. त्यामुळे घरात ताण तणाव वाढत चालला होता नात्या मध्ये भांडण वाढले होते काय करावे काही सुचत नव्हते मी एकदम परेशान झालो त्यानंतर देवा च्या कृपेने मला माझ्या मावस बहिणी कडून ज्ञानयोगा बद्दल माहिती मिळाली कोरोनाचा काळ संपला आणि ज्ञानयोग शिबीर सुरू झाले . मी शिबिरात गेलो परंतु जे माऊलीजीं ना बघितल्याबरोबर माझा आत्मविश्वास आला मला खूप आनंद झाला माझ्या जीवनात जेवढे मी देवाचे नाव घेतले जप केले पारायण केले त्याचे फळ म्हणजे मला दत्तगुरु परमपूज्य माऊलीजींच्या रूपात मिळाले असा माझा ठाम विश्वास आहे. खरंच माझा पुनर्जन्म झाला नकारात्मक आहार च्या क्लास मध्ये प पु माऊलीजीं नी सांगितले व्यसन करायचे नाही त्या दिवसापासून ते आज पर्यंत कधीच व्यसन करत नाही सर्व व्यसन सुटले मला सांगताना खूप आनंद होत आहे आणि माझे मन भरून येत आहे डोळ्यात पाणी येत आहे मागच्या चार वर्षापासून मला शुगरची एकही गोळी घ्यायची काम पडले नाही आणि माझी शुगर नॉर्मल आहे मागच्या चार वर्षात मी अजिबात आजारी पडलो नाही. मला व्हायरल इन्फेक्शन झाले नाही. माऊलीजीं तुमच्या प्रत्येक नियम पालन करतो आणि मागच्या चार वर्षापासून मी रोज साधना करतोय गोपाळकाला खातो हे सगळं परमपूज्य माऊलीजीं तुमच्यामुळे झाले तुमचे उपकार आयुष्यभर फेडू शकत नाही. आता पुढील आयष्यात मला ज्ञानयोगा ची सेवा करायची आहे माऊली जीं च कार्य सर्वा पर्यंत पोहचायचं आहे. ज्ञानयोगा चे खुप खुप धन्यवाद.. जय गुरुदेव.
-
स्वाती नवनाथ तरवडे
जय गुरुदेव, मी स्वाती नवनाथ तरवडे, मू. चेडगाव, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर. मी आणि माझे मिस्टर 2021 पासून ज्ञानयोगाशी जोडलेले आहोत. मिस्टरांचे पाय नेहमी दुखत होते म्हणून सकाळची साधना सुरू केली. पायाचे दुखणे कमी झाले आणि ऑक्टोबर 2022 मध्ये मी पहिले शिबीर पूर्ण केले. दीड महिन्यानंतर मला समजले की मी प्रेग्नंट आहे. त्या क्षणी मला फक्त माऊलीजी आणि चैतन्यवनच दिसत होते. ज्ञानयोग, माऊलीजी, चैतन्यवन काय आहे हे मी शब्दांत सांगू शकत नाही. माझ्या लग्नाला 17 वर्षे झाली होती, पण आम्हाला अपत्य नव्हते. त्यामुळे जेव्हा मला प्रेग्नन्सी कन्फर्म झाली तेव्हा माझा आनंद अवर्णनीय होता. मी सकाळच्या साधनेत माऊलीजींसोबत दीड हजार उड्या मारत होते. मी भरपूर हॉस्पिटल पाहिले होते – राहुरी, अ.नगर, पुणे, श्रीगणपूर, संभाजीनगर – IVF, IUI, लॅपरोस्कोपी या सगळ्या टेस्ट केल्या होत्या पण मला रिजल्ट मिळत नव्हता. मी प्रेग्नंट आहे हे समजल्यानंतर पहिला फोन सूर्यभान गुरुजींना केला. आणि साऊलीजींना मेसेज केला. नंतर पोट दुखू लागल्याने डॉक्टरांकडे गेले. त्यांनी सोनोग्राफी केली तर बाळाच्या बाजूने सूज आहे असे सांगितले. ब्लड क्लॉट होऊ शकतो म्हणून औषधे दिली. घरी आल्यानंतर माऊलीजींना मेसेज केला. त्यांनी सांगितले – मी सप्टेंबरमध्ये बाळ घेऊनच चैतन्यवनात येणार आहे. माऊलीजी म्हणाले – तथास्तु! ध्यान करत रहा. बाळाशी पॉझिटिव्ह बोला. मी तसेच केले. दहा दिवसांनी सोनोग्राफी केली. रिपोर्ट पूर्ण नॉर्मल आला. सूज कमी झाली होती. बाळ अगदी ठिक होते. मनापासून रोज माऊलीजींसोबत ध्यान, प्राणायाम करत होते. सत्संग ऐकत होते. माऊलीजींच्या कृपेने सर्व काही ठिक झाले. 9 महिन्यानंतर मला पेन सुरू झाले. मला अॅडमिट केले. सकाळी 9 वाजता डिलिव्हरीसाठी नेले. त्या वेळी हाताला सलाईन होती, पण मी एका हाताने जय गुरुदेव माऊलीजी एवढेच बोलले. त्यानंतर मला झोपल्यासारखे झाले, पण मला फक्त माऊलीजी दिसत होते. माऊलीजी माझ्यासोबतच होते. आणि माझी डिलिव्हरी नॉर्मल झाली. मला स्वामींच्या रूपात माऊलीजी भेटले. माऊलीजींनी अशक्य शक्य करून दाखवले. ज्ञानयोग म्हणजे निव्वळ ऊर्जेचा प्रवाह, कधीही न संपणारा कल्पवृक्ष आहे. ज्ञानयोग आणि माऊलीजींना मी कधीच विसरू शकत नाही. माऊलीजींना माझा शतशः कोटी कोटी प्रणाम!
-
नम्रता भोसले
जय गुरुदेव ज्ञानयोग व माऊलीजी हे शब्द माझ्यासाठी कल्पवृक्ष आहे, मी ज्ञानयोगाशी 2008 साली दहावीत असताना जोडल्या गेले, मी आमच्या चार भावंडांमध्ये अभ्यासामध्ये फार कमी होते, मी चैतन्यवनातील साधना शिबीर केले व त्यानंतर माझे आयुष्य हे पूर्णपणे बदलून गेले, माझ्यामधे प्रबळ आत्मविश्वास निर्माण झाला माऊलीजी सांगायचे की ठरवले की कुठलीच गोष्ट अशक्य नाही, कुठलेही कार्य करतांना 100% प्रयत्न हा झालाच पाहिजे, त्यामुळे ते कार्य साध्य होते, आणि माझी निष्ठा, श्रद्धा, विश्वास हा कुठल्याही अंधश्रद्धेविना ज्ञानयोगाच्या सकारात्मक ऊर्जेची जोडला गेला मी अभ्यासामध्ये मागे असल्यामुळे आई- वडिलांना वाटत होते की मी काही करू शकणार नाही, त्यातच नातेवाईकांकडून लग्नासाठी स्थळ सुचवायला सुरुवात केली, मला खूप वाईट वाटल आणि मी ठरवले काहीतरी करायच आणि माऊलीजीचे प्रत्येक शब्द ना शब्द लक्षात ठेऊन पूर्ण विश्वासाने अभ्यासाला लागले 12 वीत मला आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार मिळाला त्यानंतर B.A S.Y ला शिवाजी महाविद्यालय कन्नड या महाविद्यालयाची एकुण सात हजार विद्यार्थी संख्या असलेल्या महाविद्यालयातून एकुण चोवीस पैकी मी महाविद्यालयाची जनरल सेक्रेटरी झाले, एक वर्ष मी सात हजार विद्यार्थ्याचे नेतृत्व करून समस्या सोडविल्या,त्यांनंतर डॉ. बा.आ.म विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून पीएच.डी देखील पूर्ण केली, आता सध्या ICSSR न्यु दिल्ली ,शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवी पोस्ट डॉक्टरल फेलो म्हणुन मी कार्य करत आहे, तसेच इतिहासाची प्राध्यापक म्हणुन देखील कार्य करते, तसेच देवगिरी, विदर्भ या प्रांतामधील अनेक ठिकाणी व्याख्याने देण्याची संधी मला मिळते व महाराष्ट्र शासनाच्या इतिहासा संबंधीत दोन समित्यांमध्ये निमंत्रित सदस्य म्हणुन कार्यरत आहे, व हे सर्व सांगण्याचे कारण एव्हढेच की ज्ञानयोगाशी जोडण्याआधी माझे आयुष्य माझे अस्तित्व हे काय होते तसे तर अजूनही खूप काही करायचे आहेत परंतु माझी पात्रता नसताना मी जे काही थोडेफार यश संपादन करू शकले ते माझ्यासाठी चमत्कारपेक्षा कमी नाही, हे सर्व ज्ञानयोगच्या सकारात्मक ऊर्जमुळे शक्य झाले तसेच माझ्या प्रेग्नन्सीच्या वेळी मला डॉक्टरांनी तिसर्या महिन्यात बेडरेस्ट सांगितले होते, परंतु मला माझे पी.एच.डी चे फिल्डवर्क पुर्ण करायचे होते , आणि माऊलीजी नेहमीच सांगतात आपली इच्छाशक्ति प्रबळ असेल आणि प्रयत्न प्रामाणिक असतिल तर कुठलीच गोष्ट अशक्य नाही त्या शब्दांवर श्रद्धा विश्वास ठेवून मी एकुण 158 गावांचे फिल्डवर्क हे नवव्या महिन्यापर्यंत पूर्ण केले व माझे बाळ सुरक्षित आणि सर्व काही छान झाले, ह्या इतक्या अशक्य, अनपेक्षित गोष्टी साध्य झाल्या त्या ज्ञानयोगामुळे आणि ह्या आणि अश्या अनेक अनुभवाची प्रचिती ही ज्ञानयोगाशी जोडलेल्या प्रत्येक साधकाला प्रत्येक क्षणाला येते अनुभवायला मिळते ,कितीही मोठे संकट, अडचणी असल्या तरीदेखील प्रत्येक साधक हा अगदी सहज आणि आनंदाने सगळ्या गोष्टी पार करतो तसेच साधकांचे संपूर्ण जीवन हे चैतन्यमय होते हे निर्विवाद सत्य आहे व ही ज्ञानयोगाची ऊर्जा प्रत्येकाच्या आयुष्यात असावी हीच प्रार्थना करते . जय गुरुदेव माऊलीजी.
-
हर्षल अशोक ढमाले
मी हर्षल अशोक ढमाले, नाशिक जिल्ह्यातील एका छोट्या गावातून आहे.
माऊलीजी, मी इयत्ता आठवीत असताना डिसेंबर महिन्यात माझे पहिले शिबिर केले. ती आठवीच माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरली.आठवीत मला कळले की मला स्कोलिओसिस आहे. तो आजार बरा होणारा नाही; पण त्याच काळात मला ज्ञानयोग मिळाला, त्यामुळे त्याचा मला कधीही भार वाटला नाही.
शिबिरानंतर मिळालेले पहिले यश म्हणजे—मी शाळेत एक साधारण (average) विद्यार्थी असूनही, आठवीत NMMS (National Means-cum-Merit Scholarship Scheme) परीक्षेत शाळेतील अनेक हुशार विद्यार्थ्यांना मागे टाकत पहिला आलो. त्यानंतर दहावीत मला ८८.८% गुण मिळाले.
दहावी झाल्यानंतर नाशिक जिल्हा परिषदेने SUPER 50 नावाचा उपक्रम सुरू केला होता. ते समजताच मी मनोमन तुमच्याकडे प्रार्थना केली आणि SUPER 50 च्या प्रवेश परीक्षेत माझी निवड झाली. त्या उपक्रमांतर्गत आम्हाला दोन वर्षे मोफत JEE ची तयारी करून देण्यात आली. त्यातूनच आज मी IIIT नागपूर येथे फर्स्ट इयर ला शिक्षण घेत आहे.
हे सगळे माझ्याकडून होईल की नाही, याची मला खात्री नव्हती; पण मला माऊलीजींवर आणि ज्ञानयोगावर पूर्ण विश्वास होता—आणि तो आजही आहे. आता नाशिक जिल्हा परिषद चांगल्या संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना अमेरिका (NASA) भेटीसाठी घेऊन जाणार आहे.
मी इथपर्यंत पोहोचलो, त्यामागे माऊलीजी आणि ज्ञानयोग हेच कारण आहे.
एका वाक्यात सांगायचं तर माऊलीजी आणि ज्ञानयोग हाच माझा विश्वास आहे 🤗
❤धन्यवाद माऊलीजी ❤️
धन्यवाद परमात्म्या, मला ज्ञानयोग दिल्याबद्दल. -
मीरा गोरे
जय गुरुदेव माऊलीजी 🙏
तुम्ही साधना घ्यायला लावता…
त्यातून शारीरिक व्यायाम तर होतोच, पण त्यासोबत भावनिक, मानसिक आणि वैचारिक व्यायामही घडतो. तुम्ही जे काही सांगता त्यातून खूप काही आत्मसात करण्यासारखं असतं, जे जीवनात अंगीकारल्यास माणूस अधिक उत्तम घडतो.सांगायला खूप काही आहे पण अगदी थोडक्यात सांगते.
मी मागील २४ वर्षे माझ्या जन्मभूमीपासून दूर राहिले.
माझ्या कर्मभूमीची मी मनापासून ऋणी आहे…
त्या काळात मला खूप मौल्यवान ज्ञान मिळाले.
मग ती ईष्ट रामेश्वरम्—तामिळनाडूची पवित्र भूमी असो, छत्तीसगडची पावन भूमी असो, जगन्नाथाची पवित्र भूमी ओडिशा असो, तसेच काली मातेच्या आशीर्वादाने नटलेला बंगाल असो… आणि शिक्षणासाठी राजस्थान असो…मी स्वतःला खूप नशिबवान समजते. या सर्व पवित्र भूमींमध्ये प्रत्येकी साधारण तीन वर्षे राहण्याचं भाग्य मला लाभलं. त्या-त्या ठिकाणची संस्कृती, भाषा, खानपान, पोशाख हे सगळं जवळून अनुभवायला आणि शिकायला मिळालं. या सर्व ठिकाणी राहून मी अनेक गोष्टी शिकले.
मी तीन वर्षे ड्रेस डिझायनिंग शिकले, बी.ए. पूर्ण केले, ओडिशामध्ये लॉ ची पदवी घेतली, सॉफ्ट स्किल ट्रेनर आणि काउन्सेलर म्हणून भरपूर सामाजिक कार्य केले.
अनेक संस्थांमध्ये काम केले - स्थानिक संस्था, कॉर्पोरेट लेडीज क्लबमध्ये सेक्रेटरी म्हणून, तसेच आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये प्रेसिडेंटसोबत इंडिया स्टेट लेव्हल झोन ऑफिसर म्हणूनही काम करण्याची संधी मिळाली.ईश्वरकृपेने चांगली कर्मे करण्याचं भाग्य मला लाभलं. खऱ्या अर्थाने आयुष्याची सुरुवात तिथेच झाली, असं म्हणायला हरकत नाही. कारण जाणीवपूर्वक नवीन संस्कृती स्वीकारताना वैचारिक आणि बौद्धिक पातळी अधिक प्रगल्भ होते.
प्रत्येक राज्यात मी ध्यानाचे अनेक कोर्स केले आहेत. विपश्यना, ब्रह्मकुमारी, आर्ट ऑफ लिव्हिंग, प्राणिक हीलिंग...
माझ्या अनुभवातून मी हे ठामपणे सांगू शकते, ज्ञानयोग ध्यानशिबिर हे या सर्व साधनांचं सार आहे…
चैतन्यवन ही सर्वात पवित्र भूमी आहे.
विठू माऊली भवन हे एक उत्कृष्ट ध्यानकेंद्र आहे.
कृष्ण विहार हे आत्मसाक्षात्काराचं केंद्र आहे.
आणि माऊलीजी हे देवदूत आहेत...तिथे येणारा प्रत्येक आत्मा - तो पक्षी असो, प्राणी असो किंवा मनुष्य असो, मुक्तीच्या मार्गावरचा प्रवासीच असतो.
मनातील दुःख, यातना आणि शोक मुक्त करणारा तो क्षण खरंच अवर्णनीय असतो. चिंतामुक्त जीवन, जणू कापसासारखं हलकं झालं आहे, असं आयुष्य जाणवतं. हा अनुभव घेण्यासाठीही पुण्याचं संचित असावं लागतं.
खरा नशिबवान तोच जो ज्ञानयोग स्वीकारतो, खातो, पितो आणि जगतो.
गुरुकृपा लाभणं यासारखं दुसरं भाग्यच नाही.मी खरंच अहोभाग्यवान आहे मला माऊलीजी भेटले. मनातून, आत्म्यातून, भावनांच्या रोमरोमातून...
तुमच्यासाठी माझे शुभाशीर्वाद. दररोज ईश्वरचरणी एकच प्रार्थना असते - ज्ञानयोग घराघरात पोहोचो.प्रत्येक क्षणी देवाचे आभार मानते मला माऊलीजी भेटले, यासाठी…
तुम्ही अतिशय पवित्र आत्मा आहात. या युगात तुमच्यासारखं निस्वार्थी सत्कार्य करणं हे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचं आहे.
मी देवाला अंतःकरणातून नेहमी म्हणते, देवा, काहीही कर… फक्त माऊलीजींवर कधीही संकट येऊ देऊ नकोस. आणि जर आलंच, तर ते आधी माझ्यावर येऊ दे. माझे प्राण गेले तरी चालतील, पण माऊलीजी सुरक्षित राहू दे.
या विश्वाला माऊलीजींची गरज आहे, ज्ञानयोगाची गरज आहे.(शिबिरामध्ये आपण चार इच्छा व्यक्त करतो - त्यात ही एक इच्छा मी नेहमी मागते.)
एक वाक्य तुमच्यासाठी, माऊलीजी -
जग घुमियाँ.... थारे जैसा ना कोई...
-
सुनिल कोरे
माऊलीजी, सर्वप्रथम मी मनापासून तुमची माफी मागतो.
जुलै २०१९ मध्ये माझ्या व्हॉट्सॲपवर तुम्ही डोंगरावर घेतलेल्या सत्संगातील तीन–चार मिनिटांचा एक व्हिडिओ कुणीतरी पाठवला होता. त्या व्हिडिओमध्ये पती-पत्नीमधील एक खेळ दाखवला होता. त्या खेळातून दोघांची विचारसरणी कशी वेगळी असू शकते आणि त्यातून घरात कसे गैरसमज व वाद निर्माण होतात, हे अतिशय सुंदर उदाहरणातून समजावले होते. तो व्हिडिओ मला खूप आवडला आणि मी तो वारंवार पाहिला. त्या वेळी मला ज्ञानयोग किंवा माऊली यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हती.
नंतर त्या व्हिडिओमध्ये “ज्ञानयोग” असे स्टिकर दिसले. म्हणून यूट्यूबवर शोध घेतला. तुमचे अनेक सत्संग समोर आले. व्हिडिओ ऐकताना मी निर्विचार अवस्थेत जात होतो; पण प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी तुम्ही संभाजीनगरजवळील चैतन्यवनात सहा दिवसांचे निवासी शिबिर करण्याचे सांगत असायचात. ते ऐकले की मनात शंका यायची. “हा बाबा एक तास गोड बोलतो आणि शेवटी संभाजीनगरला यायला सांगतो. सहा दिवसांचे शिबिर म्हणजे राहणे-खाणे आणि मोठा खर्चच असेल,” असे विचार मनात यायचे. तुमच्याबद्दल शंका वाटायची.
कारण मी शेतकरी आहे. शेतातून दाणा-दाणा गोळा करून पैसा कमवायला किती कष्ट पडतात, हे मला चांगले माहीत आहे. त्यामुळे काही महिने मी सत्संग पाहत राहिलो. प्रत्येक वेळी शेवटी तेच ऐकायला मिळायचे आणि मनात तीच शंका निर्माण व्हायची. हे असेच जानेवारी २०२३ पर्यंत चालू होते.
जानेवारी २०२३ मध्ये तुमच्या एका यूट्यूब व्हिडिओमध्ये “सकाळची साधना मोफत आहे, दिलेल्या नंबरवर संपर्क करा” असे ऐकले. मी लगेच पंढरी गुरुजींना व्हॉट्सॲपवर मेसेज केला की मला सकाळच्या साधनेची लिंक पाठवा. त्यांनी झूम लिंक तर पाठवलीच, पण सोबतच कोणत्या महिन्यात कोणत्या तारखेला शिबिर आहे, शिबिराची फी किती आहे, चैतन्यवनात कसे यायचे—ही सगळी माहिती सविस्तर पाठवली.
मी ते सर्व वाचले आणि सहा दिवसांच्या निवासी शिबिराची फी फक्त दोन हजार रुपये आहे हे पाहून मला अक्षरशः धक्का बसला. एवढ्या कमी फीमध्ये राहणे-खाणे शक्य आहे, यावरच विश्वास बसेना. आतापर्यंत तुमच्याबद्दल जे गैरसमज मनात होते, त्याच्या अगदी उलट हे चित्र होते. शेतात काम करत असताना हे सगळे वाचले आणि त्या क्षणीच कामाचा वेग वाढवून उर्वरित कामाचे नियोजन केले, कारण शिबिर काहीच दिवसांवर आले होते.
घरी आल्यावर पत्नीला सांगितले की मला अमुक तारखेला चैतन्यवनात जायचे आहे. ती लगेच म्हणाली, “मीसुद्धा तुमच्यासोबत येते.” ७ फेब्रुवारी २०२३ रोजी आम्ही पहिल्यांदाच चैतन्यवनात आलो. सहा दिवसांच्या शिबिरात नेमके काय असते, काहीच कल्पना नव्हती. फक्त एवढी उत्सुकता होती की या सहा दिवसांत आपल्याला काय मिळणार आहे. पण तो दिवस आमच्या आयुष्यासाठी जणू पुनर्जन्म ठरला.
माझ्या आयुष्यात अनेक संघर्ष आले. लग्नाला मुलगी मिळणार नाही म्हणून घरच्यांनी आणि नातेवाईकांनी मला एक छोटासा व्यवसाय सुरू करायला लावला. नातेवाईकांकडून आणि व्याजाने पैसे घेऊन तो व्यवसाय सुरू केला. २००२ मध्ये माझे लग्न झाले आणि त्याच वेळी तो व्यवसाय बंद पडला. माझ्याकडे पाच एकर कोरडवाहू शेती होती. जूनमध्ये पेरणी केली; पण १८ दिवस पाऊसच नाही. चार वेळा पेरणी करावी लागली. नंतर पावसाळ्यात अतिवृष्टी झाली आणि शेतात पूर येऊन दोन एकरातील पीक वाहून गेले. उर्वरित तीन एकरातले पीकही फारसे चांगले झाले नाही.
८० हजार रुपयांचे कर्ज झाले. पत्नी शहरात वाढलेली; तिला शेतीची सवय नव्हती. पुढील आयुष्य खूप कष्टाचे असेल, याची जाणीव होत होती. मी घरात नेहमी शांत असायचो, कारण काहीच मार्ग दिसत नव्हता.
पुढच्या वर्षी शेजारच्या शेतात बटईने शेती झाली. ते शेत ओलिताचे असल्याने माझे शेतही ओलिताखाली आले. पुढील वर्षी स्वतःची पाण्याची मोटर बसवली. त्यानंतर एसटीडी टाकली. त्यातून चांगली कमाई झाली आणि कर्ज फिटले. या काळात मला एक मुलगी आणि एक मुलगा झाला.
नातेवाईकांची मुले चांगल्या शाळेत शिकत होती. पत्नीला वाटायचे की आपली मुले गावात राहतात. म्हणून आम्ही त्यांना यवतमाळला रूम करून शिकायला ठेवले. आई त्यांच्यासोबत राहत होती. गावात मोकळेपणाने वाढलेली मुले दहा बाय दहाच्या खोलीत राहू लागली. भांडणे, ताण वाढू लागला. पैशाचा ताण इतका होता की सगळी कमाई शहर आणि गाव यांच्यात खर्च होत होती. मला कळून चुकले की असेच चालू राहिले तर भविष्यात काहीच शिल्लक राहणार नाही.
दीड वर्षानंतर दसऱ्यालाच सगळे सामान घरी आणले आणि मुलांना गावच्या जिल्हा परिषद शाळेत घालायचे ठरवले. त्या दिवशी घरात कुणीच जेवले नाही. मी माझे हसणेच हरवून बसलो होतो.
काही वर्षांनी थोडे पैसे जमा झाले. पुन्हा कर्ज काढून चार एकर शेती घेतली. नंतर जिल्ह्याच्या ठिकाणी प्लॉट घेतला. दोन वर्षांतच त्याची किंमत चौपट झाली. तो प्लॉट विकून पुन्हा शेती घेतली. तरीही पैशाचा ताण दररोज डोक्यावर असायचाच.
शेतात मजूर मिळत नाही, रोजचा आर्थिक ताण आणि शारीरिक थकवा यामुळे मी कायम चिंतेत असायचो. त्याच काळात पोटाचा आजार सुरू झाला. अनेक डॉक्टरांनी सांगितले की हा आजार विचारांमुळे आहे. औषधे घेतली, पण आराम मिळाला नाही. विचार करणे कसे थांबवायचे, हेच समजत नव्हते.
चैतन्यवनात आल्यानंतर कळले की समस्या हा जीवनाचाच एक भाग आहे. माऊली, मी मनापासून सांगतो—तो दिवस माझ्यासाठी खरा पुनर्जन्म ठरला. आज मी खूप आनंदी आहे.
ज्ञानयोगाने माझ्या आयुष्याला पारसासारखा स्पर्श केला आणि सामान्य जीवन सोन्यासारखे उजळून निघाले. ज्ञानयोगाशी जोडल्यापासून माझे तंबाखू-गुटख्याचे व्यसन सुटले, आरोग्याच्या तक्रारीही मिटल्या. चैतन्यवनात आल्यानंतरच आपल्या कुटुंबातील माणसे आपल्यासाठी किती काही करतात, हे दिसू लागले.
परवाच्या सत्संगात एका ताईंनी प्रश्न विचारला होता की पती रिस्पेक्ट देत नाही. त्यामागची वेदना समजली; पण जो कोणी चैतन्यवनाचे शिबिर करेल, त्याला असे प्रश्न विचारायची वेळच येणार नाही, असे मला वाटते. मलाही चैतन्यवनात आल्यानंतरच कळले की माझी पत्नी माझ्यासोबत किती खंबीरपणे उभी आहे—हे ज्ञानयोगानेच दाखवले.
आज सकाळच्या साधनेत तुम्ही शेतकऱ्यांची काळजी घेत फवारणी करताना नाक-तोंड झाकण्याबद्दल, स्वच्छतेबद्दल सांगितले, ते खूप भावले. तसेच ज्ञानेश्वर सरांचा जो व्हिडिओ पाहायला सांगितला, तो मी आधीच पाहिला होता. मोरे सरांनी सांगितल्याप्रमाणे शेतीतील ज्ञानेश्वर आणि चैतन्यवनातील ज्ञानेश्वर—हे कार्य खरंच अतुलनीय आहे, माऊलीजी 🙏
-
प्रणाली पाटील
जय गुरुदेव माऊलीजी 🙏
२५ जुलैपासून मी सत्संग ऐकायला सुरुवात केली. यूट्यूबवर सहज तुमचे सत्संग दिसत होते. “एकदा पाहूया, काय आहे” म्हणून सुरुवात केली आणि आज पूर्णपणे माऊलीमय झाले आहे.
पहिल्याच सत्संगात डोळे खाडकन उघडले आणि नेमके काय चुकत होते याची जाणीव झाली. पुढे सत्संग ऐकत-ऐकत आपोआपच स्वतःमध्ये बदल घडत गेले. स्वतःला बदलण्यासाठी कोणताही विशेष प्रयत्न करावा लागला नाही. जसा एक सत्संग, तसे अनेक सकारात्मक बदल घडत गेले.
पूर्वी “अलिप्त राहणे” म्हणजे नक्की काय, याबद्दल खूप गोंधळ होता. अलिप्त राहणे म्हणजे स्वार्थी होणे का? फक्त स्वतःचाच विचार करणे का? किंवा कुणात अडकू नये म्हणून भावनांपासून दूर राहणे का? मग माणसांवर प्रेमच करू नये का? असे अनेक प्रश्न होते. पण सत्संगातून हळूहळू समजत गेले की मनापासून प्रेम करा, प्रत्येकात परमेश्वर पाहा, स्वीकारा, सोडून द्या, माफ करा, समजून घ्या. आनंदाने प्रत्येक काम करा. हसा, खेळा, नाचा, गा. देवाने काय दिले नाही यापेक्षा, किती भरभरून दिले आहे ते पाहा. राग, द्वेष, दुःख, चिंता, भूतकाळ-भविष्यकाळ, न्यूनगंड आणि नकारात्मकता सगळे दूर फेका आणि वर्तमानात जगा. सतत सकारात्मक रहा. कोणालाही दुखवू नका आणि स्वतःही दुखावून घेऊ नका. लोकांना बदलण्याचा प्रयत्न न करता स्वतःला बदला, मग त्रास होत नाही. दान करा, देण्याची वृत्ती ठेवा, सेवा करा—हे सर्व निरपेक्ष भावनेने करा. शंभर टक्के द्या; मनासारखे झाले तरी आनंद, नाही झाले तरीही आनंदच.
हे सारे सकारात्मक विचार मनात रुजत गेले आणि आपोआपच अलिप्ततेची जाणीव होऊ लागली. काहीही झाले तरी “मी आनंदीच आहे” अशी अवस्था निर्माण झाली. सगळी अस्वस्थता, चिंता आणि नकारात्मकता नाहीशी झाली.
१९ सप्टेंबरला घरी आल्यापासून मूळव्याधीच्या ऑपरेशननंतरही जो त्रास होत होता, तो पूर्णपणे गायब झाला. धडधड, भीती, लोक काय विचार करतील याची चिंता—सगळे संपले. देवाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. “मी त्याचा अंश आहे आणि तो माझ्यात आहे” असा भाव निर्माण झाला. पूर्वी कुणाचा आशीर्वाद घ्यायला कमीपणा वाटायचा; तो अहंकार गळून पडला. आता किती सकारात्मकता साठवता येईल आणि किती वाटता येईल, असे वाटू लागले. आनंदी राहण्यासाठी फिरायला जाणे किंवा बाहेर जाणे गरजेचे वाटत नाही; मूळ स्वरूप कळल्यामुळे सतत आनंदच अनुभवायला मिळतो.
साधना सुरू करण्यापूर्वी योगा क्लास, घरचा योगा असे अनेक प्रयत्न केले; पण त्यात सातत्य नव्हते, सगळे तात्पुरते होते. मात्र एक दिवस साधना सुरू केली आणि गेल्या दोन महिन्यांत एखाद-दोन अपवाद वगळता ती कधीच चुकली नाही. सक्रिय ध्यानामुळे आनंद, उत्साह वाढला; शांत झोप आणि समाधान मिळाले. पूर्वी जबरदस्ती हसणारी मी आता मनमोकळेपणाने खळखळून हसते. गोपाळकाळ्यानंतर पोट हलके झाले, भूक नीट लागू लागली. चेहऱ्यावरची चमक वाढली.
आता सोशल मीडिया नको वाटतो; सत्संग ऐकावा वाटतो. कारण कोणताही प्रसंग आला की माऊली डोळ्यांसमोर येतात आणि काय करावे याची जाणीव करून देतात. कुणाचाही राग येत नाही. शरीर आणि मन सतत हलके वाटते. आजारी असतानाही मन आतून आनंदी असते. गेल्या ३० वर्षांत जे घडले नाही, ते अवघ्या दोन महिन्यांत घडले. मी तीच आहे का जी आधी होते, याचेच आश्चर्य वाटते. आधीच ज्ञानयोग भेटला असता तर आज आयुष्य किती वेगळे असते… 🙏🙏
-
सचिन सुभाष तोतला
जय गुरुदेव माऊलीजी 🚩🙏मी सचिन सुभाष तोतला,राहणार – परळी वैजनाथ.मी २००५ साली ज्ञानयोग ध्यान शिबिर केले.माझे पहिले शिबिर झाल्यापासूनच मी ज्ञानयोगाशी आणि माऊलीजींशी अखंडपणे जोडलेलो आहे.ज्ञानयोगाशी जोडल्यापासून माझ्या जीवनात अतिशय सकारात्मक व सुंदर परिवर्तन झाले आहे 🌸✨त्या परिवर्तनांपैकी काही अनुभव खालीलप्रमाणे आहेत 👇🏻👉🏻 माझा स्वतःवरचा आत्मविश्वास (Self Confidence) मोठ्या प्रमाणात वाढला आहे 💪😊👉🏻 मला जबाबदारीची खरी जाणीव झाली आहे. त्यामुळे मी माझ्या परिवारातील तसेच माझ्या सहवासात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी मनापासून घेतो आणि ती यशस्वीपणे पूर्ण करतो 🤝✅👉🏻 मी जे कार्य हातात घेतो, ते पूर्ण विश्वासाने आणि शंभर टक्के समर्पणाने पूर्ण करतोच 🌟👉🏻 ज्ञानयोग ध्यान शिबिर केल्यापासून मी पूर्णपणे निरोगी, आनंदी व समाधानी जीवन जगत आहे 🌿😇👉🏻 मला माझ्या परमेश्वरावर (माऊलीजींवर) शंभर टक्के अढळ विश्वास आहे.ते प्रत्येक क्षणी, प्रत्येक श्वासात माझ्यासोबतच आहेत, अशी माझी ठाम भावना आहे 🕉️💖👉🏻 माझा स्वतःचा व्यवसाय आहे.मी जेव्हा-जेव्हा शिबिरासाठी जातो, तेथून मला पुढील तीन महिन्यांसाठी सकारात्मक ऊर्जा मिळते 🔆त्या ऊर्जेमुळे मी माझ्या व्यवसायात हसत-खेळत, आनंदाने व समाधानाने खूप चांगली प्रगती केली आहे 📈😄👉🏻 मी रोज सकाळी नियमित साधना करतो आणि रोज ज्ञानयोग गोपाळकाला आहार घेतो🙏🥗👉🏻 मी माझ्या देवाकडे, माझ्या परमेश्वर माऊलीजीं कडे नेहमी एकच प्रार्थना करतो —या विश्वातील प्रत्येकाला जे जे काही हवे आहे, ते माझ्याआधी मिळू दे 🌍💫सर्वांचे आयुष्य आनंदी होऊ दे,सर्वांचे कल्याण होऊ दे,आणि सर्वांना ज्ञानयोगाशी जोड 🙏🌼हीच प्रार्थना माझ्या मनातून प्रत्येक क्षणाक्षणाला आपोआप निघत असते 💞जय गुरुदेव माऊलीजी 🚩🙏|| जो जे वांछील | तो ते लाहो || -
सीमा राव
जयगुरुदेव! मी ज्ञानयोगाचा सुमारे चार वर्षांपासून भाग आहे. गेल्या चार वर्षांत माझ्या आयुष्यात बरेच काही बदलले आहे. ज्ञानयोगाने मला चांगले शारीरिक आरोग्य आणि मानसिक शांती दिली आहे. दररोज पहाटेची साधना (प्राणायाम आणि ध्यानासह व्यायाम); फेसबुक, यूट्यूब आणि झूमवरील वारंवार सत्संगामुळे जीवनातील आव्हाने आणि समस्यांना तोंड देण्यास मदत झाली आहे; स्वीकृती; समर्पण; आत्मविश्वास, शक्ती आणि धैर्य; घरी आणि इतरांशी चांगले संबंध राखणे ही काही उदाहरणे आहेत. माउलीजींचे त्यांच्या शिष्यांबद्दलचे निःशर्त प्रेम आणि आपल्याला मदत करण्यासाठी त्यांची सतत आणि अथक चिकाटी ही खरोखरच दैवी प्रेम आहे जी आपल्याला आपल्या प्रत्येकातील आत्म्याशी जोडते. शेवटी, माउलीजींमध्ये विनोदाची एक अद्भुत भावना आहे आणि त्यांच्यात एका बाळाशी आणि १०० वर्षांच्या प्रौढ व्यक्तीशी सहजतेने संपर्क साधण्याची आणि संवाद साधण्याची क्षमता आहे. धन्यवाद. जयगुरुदेव. -
अक्षय भबुतकर
माझं नाव अक्षय भबुतकर आहे. मी धामणगाव रेल्वे अमरावती मध्ये राहतो. अनुभव सांगायचं झालं तर मला खूपच जास्त ज्ञानयोग मुळे माझ्या जीवनात बदल झाले. मला माझा व्यवसायात खूप जास्त लॉस होत होता माझ्यामध्ये कॉन्फिडन्स ची खूप जास्त कमी होती आणि मी फक्त माउलीजींचे शिबिर यासाठी जॉईन केली होती की मला माझ्या व्यवसायात प्रगती झाली पाहिजे आणि चांगले मला पैसे कमावता आले पाहिजे. माऊलीजिचे व्हिडिओ मी खूप आधीपासून बघत होतो परंतु निवासी शिबिर मी कधी जॉईन नाही केले. तर विचार मनात आला कि एकदा बघून तर येऊया त्यामुळे बघण्यासाठी फक्त मी ते निवासी शिबिर जॉईन केले आणि माझं जीवन संपूर्ण बदलून गेले. मला माझ्या व्यवसायात जो लॉस होत होता तो लॉस होणे बंद झाल, खरंतर मला सर्व गोष्टी येत होत्या परंतु माझ्यात आत्मविश्वासाची कमी होती त्यामुळे ते काम मी करत नव्हतो हा सर्वात मोठा माझातला फॉल्ट होता तर ज्ञानयोग मुळे आत्मविश्वास वाढला कॉन्फिडन्स वाढला प्रत्येक नवी संधी मी घेत होतो आणि असं करता करता माझा बिझनेस आणखी जास्त वाढला. बिझनेस सोबतच माझ्या काही वाईट सवयी होत्या आणि मला अजिबात सोडायच्या नव्हत्या कारण कोणत्या वाईट सवयी मुळे मला काही तोटा होत नव्हता परंतु माउलींजी सोबत जोडलो आपल्या ज्ञानयोगा सोबत जोडलो त्यामुळे ज्या वाईट सवयी होत्या मी नॉनव्हेज खूप खात होतो चिकन मटन आणि चहा मी दिवसातून पाच ते सहा कप पियायचो आता मला तीन ते चार वर्ष झाले मी चहाला हात सुद्धा लावलेल्या नाही नॉनव्हेज सुद्धा खाल्लेले नाही आणि असा खूप साऱ्या वाईट सवयी माझा एकदम बंद झाल्या. खरंच मित्रांनो एकदा निवासी शिबिर जॉईन करून बघा तुम्हाला एक नवीन अनुभूती येणार जे तुम्ही शब्दात सांगू शकणार नाही. जय गुरुदेव. -
संजीव रेगे
आमचा ज्ञानयोगाचा परिवर्तनकारी अनुभव आम्ही दोघेही निवृत्त व्यावसायिक असून अमेरिकेत वास्तव्यास आहोत. २०२१ साली आम्ही प्रथम ज्ञानयोगाशी जोडले गेलो. त्यानंतर ऑनलाईन तसेच औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) येथे निवासी शिबिर पूर्ण केले. आज आम्ही दररोज सायंकाळी ८ ते १० या वेळेत (अमेरिका वेळमध्ये) झूम साधना करतो. माऊलीजींच्या दिव्य व ज्ञानयोगाच्या सकारात्मक ऊर्जेमुळे आमच्या जीवनात काही अशक्य गोष्टी शक्य झाल्या.अनेक वर्षे माझ्या भावाशी दुरावलेले संबंध पुन्हा अचानक नॉर्मल झाले.तसेच आमच्या दोन मोठ्या मुलांमध्ये गेली १० वर्षे असलेला गैरसमजही दूर झाला.आरोग्याच्या बाबतीतही मोठा चमत्कार घडला —मी माझा diabetes reverse केला असून आता कसलेही औषध घेत नाही.गॅस्ट्रोपॅरेसिस नावाचा एक कठीण असा पोटाचा आजार मला झाला होता, ज्याला कुठलेही औषध नाही. पण आता माझे रिपोर्ट्स पूर्णपणे नार्मल आहेत. माझे थायरॉईडही लेवल्स गेल्या तीन वर्षांपासून नॉर्मल आहेत.ज्ञानयोग शिबिर हे फक्त एक शिबिर नाही, तर आत्म्याला स्पर्श करणारा अनुभव आहे. हे आपल्याला पुन्हा स्वतःशी व ईश्वराशी जोडायला, मन-शरीराला नवी ऊर्जा द्यायला आणि जीवनाला नवा अर्थ द्यायला शिकवते. हे आपल्याला पॉज़ घेवून, मन शांत करायला आणि स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणायला प्रेरित करते. आपण अधिक जबाबदार, संवेदनशील आणि प्रेमळ होतो. इनर पीस हवी असेल, उत्तम आरोग्य हवे असेल किंवा दैनंदिन टेन्शन मधून मुक्ती हवी असेल — याचे उत्तर आहे ज्ञानयोग. हे सहा दिवसांचे शिबिर तुम्हाला अधिक शांत, संतुलित आणि आनंदी बनवते. आम्ही मनापासून सांगतो — ज्ञानयोग हे केवळ शिकण्याचे ठिकाण नाही, तर जीवनाला नवी दिशा देणारा प्रकाश आहे.. -
भरत काकडे
माझे नाव भरत काकडे आहे. मी सध्या एम बी बी एस च्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. मी ज्ञानयोग शिबिर सातवी च्या वर्गात असताना माझ्या भावासोबत केले. शिबीर करून खूप भारी वाटल, माझ्या अभ्यासात माझ्या स्टेज करियर मधे खूप छान बदल झाला. मी दहावी पर्यंत खूप सर्वसाधारण विद्यार्थी होतो, परंतु माऊलीजी आणि ज्ञानयोगामुळे मला अभ्यासात एक नवीन प्रेरणा मिळाली आणि आत्मविश्वास आला.मी माऊलीजींना माझे डॉक्टर होण्याचे स्वप्न सांगितले होते. तेव्हा मला माऊलीजींनी एकच गोष्ट सांगितली होती आणि मला ती गोष्ट अजून आठवतेय की “तू १००% प्रयत्न कर, तू डॉक्टर होणारच”. आणि माझ स्वप्न पूर्ण होत आहे. आज मी जे काही आहे ती सर्व माऊलीजी आणि ज्ञानयोगाची कृपा आहे.ज्ञानयोगामुळे माझ्या वैयक्तिक जीवन मधे तर बदल झालेच, परंतु घरातील वातावरण जणू गोकुळ आणि वृंदावन झाले आहे. प्रत्येकजण एकमेकाला समजून घेऊ लागला. माफ करणे, प्रेमाने वागणे हे सगळं ज्ञानयोगाची देणगी आहे.आत्ताचे बाहेरील वातावरण असे असताना ज्ञानयोग माझ्या सोबत आहे, त्यामुळे मी सर्व व्यसनापासून दूर आहे. आणि याचा मला सार्थ अभिमान आहे. या सर्वांच श्रेय प. पु. माऊलीजी यांच्या चरणी. -
अशोक नारायण देशपांडे
जय गुरुदेव, मी अशोक नारायण देशपांडे,वय 50, संभाजीनगर येथे राहतो कंपनी मध्ये जॉब करतो ज्ञानयोगात येण्यापूर्वी माझे जीवन खूपच भयंकर होते विस्कळीत होतेवयाच्या 20 व्या वर्षापासून मला तंबाखू गुटखा चहाचे व्यसन जडले होते खूप प्रयत्न केले पण व्यसन काही जात नव्हते. त्यानंतर वयाच्या 35 व्या वर्षी मला शुगर चा त्रास सुरू झाला त्यासाठी मला आयुर्वेदिक आणि ऍलोपॅथी दोन्ही मिळून एकूण सात गोळ्या रोज घेत होतो. गोळ्या घेऊन सुद्धा माझी शुगर लेवल नॉर्मल रहात नव्हती जीवन खूपच असह्य झाले होते. मणक्यात गॅप आल्याने डॉक्टरने मला खाली बसायला नाही सांगितले होते जास्त उभे राहिल्यामुळे मला वेरीकोज व्हेन्स चा त्रास सुरू झाला . माझी अडचण काही केल्या कमी होत नव्हती रात्री झोप येत नव्हती खुप वेदना सुरू झाल्या जीवन नकोसे वाटत होते. जास्त दिवस जगु शकत नाही असेच रोज विचार मनात येत होते. त्यामुळे घरात ताण तणाव वाढत चालला होता नात्या मध्ये भांडण वाढले होते काय करावे काही सुचत नव्हते मी एकदम परेशान झालो त्यानंतर देवा च्या कृपेने मला माझ्या मावस बहिणी कडून ज्ञानयोगा बद्दल माहिती मिळाली कोरोनाचा काळ संपला आणि ज्ञानयोग शिबीर सुरू झाले . मी शिबिरात गेलो परंतु जे माऊलीजीं ना बघितल्याबरोबर माझा आत्मविश्वास आला मला खूप आनंद झाला माझ्या जीवनात जेवढे मी देवाचे नाव घेतले जप केले पारायण केले त्याचे फळ म्हणजे मला दत्तगुरु परमपूज्य माऊलीजींच्या रूपात मिळाले असा माझा ठाम विश्वास आहे. खरंच माझा पुनर्जन्म झाला नकारात्मक आहार च्या क्लास मध्ये प पु माऊलीजीं नी सांगितले व्यसन करायचे नाही त्या दिवसापासून ते आज पर्यंत कधीच व्यसन करत नाही सर्व व्यसन सुटले मला सांगताना खूप आनंद होत आहे आणि माझे मन भरून येत आहे डोळ्यात पाणी येत आहे मागच्या चार वर्षापासून मला शुगरची एकही गोळी घ्यायची काम पडले नाही आणि माझी शुगर नॉर्मल आहे मागच्या चार वर्षात मी अजिबात आजारी पडलो नाही. मला व्हायरल इन्फेक्शन झाले नाही. माऊलीजीं तुमच्या प्रत्येक नियम पालन करतो आणि मागच्या चार वर्षापासून मी रोज साधना करतोय गोपाळकाला खातो हे सगळं परमपूज्य माऊलीजीं तुमच्यामुळे झाले तुमचे उपकार आयुष्यभर फेडू शकत नाही. आता पुढील आयष्यात मला ज्ञानयोगा ची सेवा करायची आहे माऊली जीं च कार्य सर्वा पर्यंत पोहचायचं आहे. ज्ञानयोगा चे खुप खुप धन्यवाद.. जय गुरुदेव. -
स्वाती नवनाथ तरवडे
जय गुरुदेव, मी स्वाती नवनाथ तरवडे, मू. चेडगाव, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर. मी आणि माझे मिस्टर 2021 पासून ज्ञानयोगाशी जोडलेले आहोत. मिस्टरांचे पाय नेहमी दुखत होते म्हणून सकाळची साधना सुरू केली. पायाचे दुखणे कमी झाले आणि ऑक्टोबर 2022 मध्ये मी पहिले शिबीर पूर्ण केले. दीड महिन्यानंतर मला समजले की मी प्रेग्नंट आहे. त्या क्षणी मला फक्त माऊलीजी आणि चैतन्यवनच दिसत होते. ज्ञानयोग, माऊलीजी, चैतन्यवन काय आहे हे मी शब्दांत सांगू शकत नाही. माझ्या लग्नाला 17 वर्षे झाली होती, पण आम्हाला अपत्य नव्हते. त्यामुळे जेव्हा मला प्रेग्नन्सी कन्फर्म झाली तेव्हा माझा आनंद अवर्णनीय होता. मी सकाळच्या साधनेत माऊलीजींसोबत दीड हजार उड्या मारत होते. मी भरपूर हॉस्पिटल पाहिले होते – राहुरी, अ.नगर, पुणे, श्रीगणपूर, संभाजीनगर – IVF, IUI, लॅपरोस्कोपी या सगळ्या टेस्ट केल्या होत्या पण मला रिजल्ट मिळत नव्हता. मी प्रेग्नंट आहे हे समजल्यानंतर पहिला फोन सूर्यभान गुरुजींना केला. आणि साऊलीजींना मेसेज केला. नंतर पोट दुखू लागल्याने डॉक्टरांकडे गेले. त्यांनी सोनोग्राफी केली तर बाळाच्या बाजूने सूज आहे असे सांगितले. ब्लड क्लॉट होऊ शकतो म्हणून औषधे दिली. घरी आल्यानंतर माऊलीजींना मेसेज केला. त्यांनी सांगितले – मी सप्टेंबरमध्ये बाळ घेऊनच चैतन्यवनात येणार आहे. माऊलीजी म्हणाले – तथास्तु! ध्यान करत रहा. बाळाशी पॉझिटिव्ह बोला. मी तसेच केले. दहा दिवसांनी सोनोग्राफी केली. रिपोर्ट पूर्ण नॉर्मल आला. सूज कमी झाली होती. बाळ अगदी ठिक होते. मनापासून रोज माऊलीजींसोबत ध्यान, प्राणायाम करत होते. सत्संग ऐकत होते. माऊलीजींच्या कृपेने सर्व काही ठिक झाले. 9 महिन्यानंतर मला पेन सुरू झाले. मला अॅडमिट केले. सकाळी 9 वाजता डिलिव्हरीसाठी नेले. त्या वेळी हाताला सलाईन होती, पण मी एका हाताने जय गुरुदेव माऊलीजी एवढेच बोलले. त्यानंतर मला झोपल्यासारखे झाले, पण मला फक्त माऊलीजी दिसत होते. माऊलीजी माझ्यासोबतच होते. आणि माझी डिलिव्हरी नॉर्मल झाली. मला स्वामींच्या रूपात माऊलीजी भेटले. माऊलीजींनी अशक्य शक्य करून दाखवले. ज्ञानयोग म्हणजे निव्वळ ऊर्जेचा प्रवाह, कधीही न संपणारा कल्पवृक्ष आहे. ज्ञानयोग आणि माऊलीजींना मी कधीच विसरू शकत नाही. माऊलीजींना माझा शतशः कोटी कोटी प्रणाम! -
नम्रता भोसले
जय गुरुदेव ज्ञानयोग व माऊलीजी हे शब्द माझ्यासाठी कल्पवृक्ष आहे, मी ज्ञानयोगाशी 2008 साली दहावीत असताना जोडल्या गेले, मी आमच्या चार भावंडांमध्ये अभ्यासामध्ये फार कमी होते, मी चैतन्यवनातील साधना शिबीर केले व त्यानंतर माझे आयुष्य हे पूर्णपणे बदलून गेले, माझ्यामधे प्रबळ आत्मविश्वास निर्माण झाला माऊलीजी सांगायचे की ठरवले की कुठलीच गोष्ट अशक्य नाही, कुठलेही कार्य करतांना 100% प्रयत्न हा झालाच पाहिजे, त्यामुळे ते कार्य साध्य होते, आणि माझी निष्ठा, श्रद्धा, विश्वास हा कुठल्याही अंधश्रद्धेविना ज्ञानयोगाच्या सकारात्मक ऊर्जेची जोडला गेला मी अभ्यासामध्ये मागे असल्यामुळे आई- वडिलांना वाटत होते की मी काही करू शकणार नाही, त्यातच नातेवाईकांकडून लग्नासाठी स्थळ सुचवायला सुरुवात केली, मला खूप वाईट वाटल आणि मी ठरवले काहीतरी करायच आणि माऊलीजीचे प्रत्येक शब्द ना शब्द लक्षात ठेऊन पूर्ण विश्वासाने अभ्यासाला लागले 12 वीत मला आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार मिळाला त्यानंतर B.A S.Y ला शिवाजी महाविद्यालय कन्नड या महाविद्यालयाची एकुण सात हजार विद्यार्थी संख्या असलेल्या महाविद्यालयातून एकुण चोवीस पैकी मी महाविद्यालयाची जनरल सेक्रेटरी झाले, एक वर्ष मी सात हजार विद्यार्थ्याचे नेतृत्व करून समस्या सोडविल्या,त्यांनंतर डॉ. बा.आ.म विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून पीएच.डी देखील पूर्ण केली, आता सध्या ICSSR न्यु दिल्ली ,शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवी पोस्ट डॉक्टरल फेलो म्हणुन मी कार्य करत आहे, तसेच इतिहासाची प्राध्यापक म्हणुन देखील कार्य करते, तसेच देवगिरी, विदर्भ या प्रांतामधील अनेक ठिकाणी व्याख्याने देण्याची संधी मला मिळते व महाराष्ट्र शासनाच्या इतिहासा संबंधीत दोन समित्यांमध्ये निमंत्रित सदस्य म्हणुन कार्यरत आहे, व हे सर्व सांगण्याचे कारण एव्हढेच की ज्ञानयोगाशी जोडण्याआधी माझे आयुष्य माझे अस्तित्व हे काय होते तसे तर अजूनही खूप काही करायचे आहेत परंतु माझी पात्रता नसताना मी जे काही थोडेफार यश संपादन करू शकले ते माझ्यासाठी चमत्कारपेक्षा कमी नाही, हे सर्व ज्ञानयोगच्या सकारात्मक ऊर्जमुळे शक्य झाले तसेच माझ्या प्रेग्नन्सीच्या वेळी मला डॉक्टरांनी तिसर्या महिन्यात बेडरेस्ट सांगितले होते, परंतु मला माझे पी.एच.डी चे फिल्डवर्क पुर्ण करायचे होते , आणि माऊलीजी नेहमीच सांगतात आपली इच्छाशक्ति प्रबळ असेल आणि प्रयत्न प्रामाणिक असतिल तर कुठलीच गोष्ट अशक्य नाही त्या शब्दांवर श्रद्धा विश्वास ठेवून मी एकुण 158 गावांचे फिल्डवर्क हे नवव्या महिन्यापर्यंत पूर्ण केले व माझे बाळ सुरक्षित आणि सर्व काही छान झाले, ह्या इतक्या अशक्य, अनपेक्षित गोष्टी साध्य झाल्या त्या ज्ञानयोगामुळे आणि ह्या आणि अश्या अनेक अनुभवाची प्रचिती ही ज्ञानयोगाशी जोडलेल्या प्रत्येक साधकाला प्रत्येक क्षणाला येते अनुभवायला मिळते ,कितीही मोठे संकट, अडचणी असल्या तरीदेखील प्रत्येक साधक हा अगदी सहज आणि आनंदाने सगळ्या गोष्टी पार करतो तसेच साधकांचे संपूर्ण जीवन हे चैतन्यमय होते हे निर्विवाद सत्य आहे व ही ज्ञानयोगाची ऊर्जा प्रत्येकाच्या आयुष्यात असावी हीच प्रार्थना करते . जय गुरुदेव माऊलीजी. -
हर्षल अशोक ढमाले
मी हर्षल अशोक ढमाले, नाशिक जिल्ह्यातील एका छोट्या गावातून आहे.माऊलीजी, मी इयत्ता आठवीत असताना डिसेंबर महिन्यात माझे पहिले शिबिर केले. ती आठवीच माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरली.आठवीत मला कळले की मला स्कोलिओसिस आहे. तो आजार बरा होणारा नाही; पण त्याच काळात मला ज्ञानयोग मिळाला, त्यामुळे त्याचा मला कधीही भार वाटला नाही.शिबिरानंतर मिळालेले पहिले यश म्हणजे—मी शाळेत एक साधारण (average) विद्यार्थी असूनही, आठवीत NMMS (National Means-cum-Merit Scholarship Scheme) परीक्षेत शाळेतील अनेक हुशार विद्यार्थ्यांना मागे टाकत पहिला आलो. त्यानंतर दहावीत मला ८८.८% गुण मिळाले.दहावी झाल्यानंतर नाशिक जिल्हा परिषदेने SUPER 50 नावाचा उपक्रम सुरू केला होता. ते समजताच मी मनोमन तुमच्याकडे प्रार्थना केली आणि SUPER 50 च्या प्रवेश परीक्षेत माझी निवड झाली. त्या उपक्रमांतर्गत आम्हाला दोन वर्षे मोफत JEE ची तयारी करून देण्यात आली. त्यातूनच आज मी IIIT नागपूर येथे फर्स्ट इयर ला शिक्षण घेत आहे.हे सगळे माझ्याकडून होईल की नाही, याची मला खात्री नव्हती; पण मला माऊलीजींवर आणि ज्ञानयोगावर पूर्ण विश्वास होता—आणि तो आजही आहे. आता नाशिक जिल्हा परिषद चांगल्या संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना अमेरिका (NASA) भेटीसाठी घेऊन जाणार आहे.मी इथपर्यंत पोहोचलो, त्यामागे माऊलीजी आणि ज्ञानयोग हेच कारण आहे.एका वाक्यात सांगायचं तर माऊलीजी आणि ज्ञानयोग हाच माझा विश्वास आहे 🤗❤धन्यवाद माऊलीजी ❤️धन्यवाद परमात्म्या, मला ज्ञानयोग दिल्याबद्दल. -
मीरा गोरे
जय गुरुदेव माऊलीजी 🙏तुम्ही साधना घ्यायला लावता…त्यातून शारीरिक व्यायाम तर होतोच, पण त्यासोबत भावनिक, मानसिक आणि वैचारिक व्यायामही घडतो. तुम्ही जे काही सांगता त्यातून खूप काही आत्मसात करण्यासारखं असतं, जे जीवनात अंगीकारल्यास माणूस अधिक उत्तम घडतो.सांगायला खूप काही आहे पण अगदी थोडक्यात सांगते.मी मागील २४ वर्षे माझ्या जन्मभूमीपासून दूर राहिले.माझ्या कर्मभूमीची मी मनापासून ऋणी आहे…त्या काळात मला खूप मौल्यवान ज्ञान मिळाले.मग ती ईष्ट रामेश्वरम्—तामिळनाडूची पवित्र भूमी असो, छत्तीसगडची पावन भूमी असो, जगन्नाथाची पवित्र भूमी ओडिशा असो, तसेच काली मातेच्या आशीर्वादाने नटलेला बंगाल असो… आणि शिक्षणासाठी राजस्थान असो…मी स्वतःला खूप नशिबवान समजते. या सर्व पवित्र भूमींमध्ये प्रत्येकी साधारण तीन वर्षे राहण्याचं भाग्य मला लाभलं. त्या-त्या ठिकाणची संस्कृती, भाषा, खानपान, पोशाख हे सगळं जवळून अनुभवायला आणि शिकायला मिळालं. या सर्व ठिकाणी राहून मी अनेक गोष्टी शिकले.मी तीन वर्षे ड्रेस डिझायनिंग शिकले, बी.ए. पूर्ण केले, ओडिशामध्ये लॉ ची पदवी घेतली, सॉफ्ट स्किल ट्रेनर आणि काउन्सेलर म्हणून भरपूर सामाजिक कार्य केले.अनेक संस्थांमध्ये काम केले - स्थानिक संस्था, कॉर्पोरेट लेडीज क्लबमध्ये सेक्रेटरी म्हणून, तसेच आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये प्रेसिडेंटसोबत इंडिया स्टेट लेव्हल झोन ऑफिसर म्हणूनही काम करण्याची संधी मिळाली.ईश्वरकृपेने चांगली कर्मे करण्याचं भाग्य मला लाभलं. खऱ्या अर्थाने आयुष्याची सुरुवात तिथेच झाली, असं म्हणायला हरकत नाही. कारण जाणीवपूर्वक नवीन संस्कृती स्वीकारताना वैचारिक आणि बौद्धिक पातळी अधिक प्रगल्भ होते.प्रत्येक राज्यात मी ध्यानाचे अनेक कोर्स केले आहेत. विपश्यना, ब्रह्मकुमारी, आर्ट ऑफ लिव्हिंग, प्राणिक हीलिंग...माझ्या अनुभवातून मी हे ठामपणे सांगू शकते, ज्ञानयोग ध्यानशिबिर हे या सर्व साधनांचं सार आहे…चैतन्यवन ही सर्वात पवित्र भूमी आहे.विठू माऊली भवन हे एक उत्कृष्ट ध्यानकेंद्र आहे.कृष्ण विहार हे आत्मसाक्षात्काराचं केंद्र आहे.आणि माऊलीजी हे देवदूत आहेत...तिथे येणारा प्रत्येक आत्मा - तो पक्षी असो, प्राणी असो किंवा मनुष्य असो, मुक्तीच्या मार्गावरचा प्रवासीच असतो.मनातील दुःख, यातना आणि शोक मुक्त करणारा तो क्षण खरंच अवर्णनीय असतो. चिंतामुक्त जीवन, जणू कापसासारखं हलकं झालं आहे, असं आयुष्य जाणवतं. हा अनुभव घेण्यासाठीही पुण्याचं संचित असावं लागतं.खरा नशिबवान तोच जो ज्ञानयोग स्वीकारतो, खातो, पितो आणि जगतो.गुरुकृपा लाभणं यासारखं दुसरं भाग्यच नाही.मी खरंच अहोभाग्यवान आहे मला माऊलीजी भेटले. मनातून, आत्म्यातून, भावनांच्या रोमरोमातून...तुमच्यासाठी माझे शुभाशीर्वाद. दररोज ईश्वरचरणी एकच प्रार्थना असते - ज्ञानयोग घराघरात पोहोचो.प्रत्येक क्षणी देवाचे आभार मानते मला माऊलीजी भेटले, यासाठी…तुम्ही अतिशय पवित्र आत्मा आहात. या युगात तुमच्यासारखं निस्वार्थी सत्कार्य करणं हे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचं आहे.मी देवाला अंतःकरणातून नेहमी म्हणते, देवा, काहीही कर… फक्त माऊलीजींवर कधीही संकट येऊ देऊ नकोस. आणि जर आलंच, तर ते आधी माझ्यावर येऊ दे. माझे प्राण गेले तरी चालतील, पण माऊलीजी सुरक्षित राहू दे.या विश्वाला माऊलीजींची गरज आहे, ज्ञानयोगाची गरज आहे.(शिबिरामध्ये आपण चार इच्छा व्यक्त करतो - त्यात ही एक इच्छा मी नेहमी मागते.)एक वाक्य तुमच्यासाठी, माऊलीजी -जग घुमियाँ.... थारे जैसा ना कोई... -
सुनिल कोरे
माऊलीजी, सर्वप्रथम मी मनापासून तुमची माफी मागतो.जुलै २०१९ मध्ये माझ्या व्हॉट्सॲपवर तुम्ही डोंगरावर घेतलेल्या सत्संगातील तीन–चार मिनिटांचा एक व्हिडिओ कुणीतरी पाठवला होता. त्या व्हिडिओमध्ये पती-पत्नीमधील एक खेळ दाखवला होता. त्या खेळातून दोघांची विचारसरणी कशी वेगळी असू शकते आणि त्यातून घरात कसे गैरसमज व वाद निर्माण होतात, हे अतिशय सुंदर उदाहरणातून समजावले होते. तो व्हिडिओ मला खूप आवडला आणि मी तो वारंवार पाहिला. त्या वेळी मला ज्ञानयोग किंवा माऊली यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हती.नंतर त्या व्हिडिओमध्ये “ज्ञानयोग” असे स्टिकर दिसले. म्हणून यूट्यूबवर शोध घेतला. तुमचे अनेक सत्संग समोर आले. व्हिडिओ ऐकताना मी निर्विचार अवस्थेत जात होतो; पण प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी तुम्ही संभाजीनगरजवळील चैतन्यवनात सहा दिवसांचे निवासी शिबिर करण्याचे सांगत असायचात. ते ऐकले की मनात शंका यायची. “हा बाबा एक तास गोड बोलतो आणि शेवटी संभाजीनगरला यायला सांगतो. सहा दिवसांचे शिबिर म्हणजे राहणे-खाणे आणि मोठा खर्चच असेल,” असे विचार मनात यायचे. तुमच्याबद्दल शंका वाटायची.कारण मी शेतकरी आहे. शेतातून दाणा-दाणा गोळा करून पैसा कमवायला किती कष्ट पडतात, हे मला चांगले माहीत आहे. त्यामुळे काही महिने मी सत्संग पाहत राहिलो. प्रत्येक वेळी शेवटी तेच ऐकायला मिळायचे आणि मनात तीच शंका निर्माण व्हायची. हे असेच जानेवारी २०२३ पर्यंत चालू होते.जानेवारी २०२३ मध्ये तुमच्या एका यूट्यूब व्हिडिओमध्ये “सकाळची साधना मोफत आहे, दिलेल्या नंबरवर संपर्क करा” असे ऐकले. मी लगेच पंढरी गुरुजींना व्हॉट्सॲपवर मेसेज केला की मला सकाळच्या साधनेची लिंक पाठवा. त्यांनी झूम लिंक तर पाठवलीच, पण सोबतच कोणत्या महिन्यात कोणत्या तारखेला शिबिर आहे, शिबिराची फी किती आहे, चैतन्यवनात कसे यायचे—ही सगळी माहिती सविस्तर पाठवली.मी ते सर्व वाचले आणि सहा दिवसांच्या निवासी शिबिराची फी फक्त दोन हजार रुपये आहे हे पाहून मला अक्षरशः धक्का बसला. एवढ्या कमी फीमध्ये राहणे-खाणे शक्य आहे, यावरच विश्वास बसेना. आतापर्यंत तुमच्याबद्दल जे गैरसमज मनात होते, त्याच्या अगदी उलट हे चित्र होते. शेतात काम करत असताना हे सगळे वाचले आणि त्या क्षणीच कामाचा वेग वाढवून उर्वरित कामाचे नियोजन केले, कारण शिबिर काहीच दिवसांवर आले होते.घरी आल्यावर पत्नीला सांगितले की मला अमुक तारखेला चैतन्यवनात जायचे आहे. ती लगेच म्हणाली, “मीसुद्धा तुमच्यासोबत येते.” ७ फेब्रुवारी २०२३ रोजी आम्ही पहिल्यांदाच चैतन्यवनात आलो. सहा दिवसांच्या शिबिरात नेमके काय असते, काहीच कल्पना नव्हती. फक्त एवढी उत्सुकता होती की या सहा दिवसांत आपल्याला काय मिळणार आहे. पण तो दिवस आमच्या आयुष्यासाठी जणू पुनर्जन्म ठरला.माझ्या आयुष्यात अनेक संघर्ष आले. लग्नाला मुलगी मिळणार नाही म्हणून घरच्यांनी आणि नातेवाईकांनी मला एक छोटासा व्यवसाय सुरू करायला लावला. नातेवाईकांकडून आणि व्याजाने पैसे घेऊन तो व्यवसाय सुरू केला. २००२ मध्ये माझे लग्न झाले आणि त्याच वेळी तो व्यवसाय बंद पडला. माझ्याकडे पाच एकर कोरडवाहू शेती होती. जूनमध्ये पेरणी केली; पण १८ दिवस पाऊसच नाही. चार वेळा पेरणी करावी लागली. नंतर पावसाळ्यात अतिवृष्टी झाली आणि शेतात पूर येऊन दोन एकरातील पीक वाहून गेले. उर्वरित तीन एकरातले पीकही फारसे चांगले झाले नाही.८० हजार रुपयांचे कर्ज झाले. पत्नी शहरात वाढलेली; तिला शेतीची सवय नव्हती. पुढील आयुष्य खूप कष्टाचे असेल, याची जाणीव होत होती. मी घरात नेहमी शांत असायचो, कारण काहीच मार्ग दिसत नव्हता.पुढच्या वर्षी शेजारच्या शेतात बटईने शेती झाली. ते शेत ओलिताचे असल्याने माझे शेतही ओलिताखाली आले. पुढील वर्षी स्वतःची पाण्याची मोटर बसवली. त्यानंतर एसटीडी टाकली. त्यातून चांगली कमाई झाली आणि कर्ज फिटले. या काळात मला एक मुलगी आणि एक मुलगा झाला.नातेवाईकांची मुले चांगल्या शाळेत शिकत होती. पत्नीला वाटायचे की आपली मुले गावात राहतात. म्हणून आम्ही त्यांना यवतमाळला रूम करून शिकायला ठेवले. आई त्यांच्यासोबत राहत होती. गावात मोकळेपणाने वाढलेली मुले दहा बाय दहाच्या खोलीत राहू लागली. भांडणे, ताण वाढू लागला. पैशाचा ताण इतका होता की सगळी कमाई शहर आणि गाव यांच्यात खर्च होत होती. मला कळून चुकले की असेच चालू राहिले तर भविष्यात काहीच शिल्लक राहणार नाही.दीड वर्षानंतर दसऱ्यालाच सगळे सामान घरी आणले आणि मुलांना गावच्या जिल्हा परिषद शाळेत घालायचे ठरवले. त्या दिवशी घरात कुणीच जेवले नाही. मी माझे हसणेच हरवून बसलो होतो.काही वर्षांनी थोडे पैसे जमा झाले. पुन्हा कर्ज काढून चार एकर शेती घेतली. नंतर जिल्ह्याच्या ठिकाणी प्लॉट घेतला. दोन वर्षांतच त्याची किंमत चौपट झाली. तो प्लॉट विकून पुन्हा शेती घेतली. तरीही पैशाचा ताण दररोज डोक्यावर असायचाच.शेतात मजूर मिळत नाही, रोजचा आर्थिक ताण आणि शारीरिक थकवा यामुळे मी कायम चिंतेत असायचो. त्याच काळात पोटाचा आजार सुरू झाला. अनेक डॉक्टरांनी सांगितले की हा आजार विचारांमुळे आहे. औषधे घेतली, पण आराम मिळाला नाही. विचार करणे कसे थांबवायचे, हेच समजत नव्हते.चैतन्यवनात आल्यानंतर कळले की समस्या हा जीवनाचाच एक भाग आहे. माऊली, मी मनापासून सांगतो—तो दिवस माझ्यासाठी खरा पुनर्जन्म ठरला. आज मी खूप आनंदी आहे.ज्ञानयोगाने माझ्या आयुष्याला पारसासारखा स्पर्श केला आणि सामान्य जीवन सोन्यासारखे उजळून निघाले. ज्ञानयोगाशी जोडल्यापासून माझे तंबाखू-गुटख्याचे व्यसन सुटले, आरोग्याच्या तक्रारीही मिटल्या. चैतन्यवनात आल्यानंतरच आपल्या कुटुंबातील माणसे आपल्यासाठी किती काही करतात, हे दिसू लागले.परवाच्या सत्संगात एका ताईंनी प्रश्न विचारला होता की पती रिस्पेक्ट देत नाही. त्यामागची वेदना समजली; पण जो कोणी चैतन्यवनाचे शिबिर करेल, त्याला असे प्रश्न विचारायची वेळच येणार नाही, असे मला वाटते. मलाही चैतन्यवनात आल्यानंतरच कळले की माझी पत्नी माझ्यासोबत किती खंबीरपणे उभी आहे—हे ज्ञानयोगानेच दाखवले.आज सकाळच्या साधनेत तुम्ही शेतकऱ्यांची काळजी घेत फवारणी करताना नाक-तोंड झाकण्याबद्दल, स्वच्छतेबद्दल सांगितले, ते खूप भावले. तसेच ज्ञानेश्वर सरांचा जो व्हिडिओ पाहायला सांगितला, तो मी आधीच पाहिला होता. मोरे सरांनी सांगितल्याप्रमाणे शेतीतील ज्ञानेश्वर आणि चैतन्यवनातील ज्ञानेश्वर—हे कार्य खरंच अतुलनीय आहे, माऊलीजी 🙏 -
प्रणाली पाटील
जय गुरुदेव माऊलीजी 🙏२५ जुलैपासून मी सत्संग ऐकायला सुरुवात केली. यूट्यूबवर सहज तुमचे सत्संग दिसत होते. “एकदा पाहूया, काय आहे” म्हणून सुरुवात केली आणि आज पूर्णपणे माऊलीमय झाले आहे.पहिल्याच सत्संगात डोळे खाडकन उघडले आणि नेमके काय चुकत होते याची जाणीव झाली. पुढे सत्संग ऐकत-ऐकत आपोआपच स्वतःमध्ये बदल घडत गेले. स्वतःला बदलण्यासाठी कोणताही विशेष प्रयत्न करावा लागला नाही. जसा एक सत्संग, तसे अनेक सकारात्मक बदल घडत गेले.पूर्वी “अलिप्त राहणे” म्हणजे नक्की काय, याबद्दल खूप गोंधळ होता. अलिप्त राहणे म्हणजे स्वार्थी होणे का? फक्त स्वतःचाच विचार करणे का? किंवा कुणात अडकू नये म्हणून भावनांपासून दूर राहणे का? मग माणसांवर प्रेमच करू नये का? असे अनेक प्रश्न होते. पण सत्संगातून हळूहळू समजत गेले की मनापासून प्रेम करा, प्रत्येकात परमेश्वर पाहा, स्वीकारा, सोडून द्या, माफ करा, समजून घ्या. आनंदाने प्रत्येक काम करा. हसा, खेळा, नाचा, गा. देवाने काय दिले नाही यापेक्षा, किती भरभरून दिले आहे ते पाहा. राग, द्वेष, दुःख, चिंता, भूतकाळ-भविष्यकाळ, न्यूनगंड आणि नकारात्मकता सगळे दूर फेका आणि वर्तमानात जगा. सतत सकारात्मक रहा. कोणालाही दुखवू नका आणि स्वतःही दुखावून घेऊ नका. लोकांना बदलण्याचा प्रयत्न न करता स्वतःला बदला, मग त्रास होत नाही. दान करा, देण्याची वृत्ती ठेवा, सेवा करा—हे सर्व निरपेक्ष भावनेने करा. शंभर टक्के द्या; मनासारखे झाले तरी आनंद, नाही झाले तरीही आनंदच.हे सारे सकारात्मक विचार मनात रुजत गेले आणि आपोआपच अलिप्ततेची जाणीव होऊ लागली. काहीही झाले तरी “मी आनंदीच आहे” अशी अवस्था निर्माण झाली. सगळी अस्वस्थता, चिंता आणि नकारात्मकता नाहीशी झाली.१९ सप्टेंबरला घरी आल्यापासून मूळव्याधीच्या ऑपरेशननंतरही जो त्रास होत होता, तो पूर्णपणे गायब झाला. धडधड, भीती, लोक काय विचार करतील याची चिंता—सगळे संपले. देवाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. “मी त्याचा अंश आहे आणि तो माझ्यात आहे” असा भाव निर्माण झाला. पूर्वी कुणाचा आशीर्वाद घ्यायला कमीपणा वाटायचा; तो अहंकार गळून पडला. आता किती सकारात्मकता साठवता येईल आणि किती वाटता येईल, असे वाटू लागले. आनंदी राहण्यासाठी फिरायला जाणे किंवा बाहेर जाणे गरजेचे वाटत नाही; मूळ स्वरूप कळल्यामुळे सतत आनंदच अनुभवायला मिळतो.साधना सुरू करण्यापूर्वी योगा क्लास, घरचा योगा असे अनेक प्रयत्न केले; पण त्यात सातत्य नव्हते, सगळे तात्पुरते होते. मात्र एक दिवस साधना सुरू केली आणि गेल्या दोन महिन्यांत एखाद-दोन अपवाद वगळता ती कधीच चुकली नाही. सक्रिय ध्यानामुळे आनंद, उत्साह वाढला; शांत झोप आणि समाधान मिळाले. पूर्वी जबरदस्ती हसणारी मी आता मनमोकळेपणाने खळखळून हसते. गोपाळकाळ्यानंतर पोट हलके झाले, भूक नीट लागू लागली. चेहऱ्यावरची चमक वाढली.आता सोशल मीडिया नको वाटतो; सत्संग ऐकावा वाटतो. कारण कोणताही प्रसंग आला की माऊली डोळ्यांसमोर येतात आणि काय करावे याची जाणीव करून देतात. कुणाचाही राग येत नाही. शरीर आणि मन सतत हलके वाटते. आजारी असतानाही मन आतून आनंदी असते. गेल्या ३० वर्षांत जे घडले नाही, ते अवघ्या दोन महिन्यांत घडले. मी तीच आहे का जी आधी होते, याचेच आश्चर्य वाटते. आधीच ज्ञानयोग भेटला असता तर आज आयुष्य किती वेगळे असते… 🙏🙏
दिवसाची सकारात्मक सुरुवात!
सकाळची साधना
दररोज सकाळी ५:३८ ते ७:३० या वेळेत व्यायाम करा
प्राणायाम, ध्यान आणि योगामुळे तणाव कमी होतो, आरोग्य सुधारते आणि आत्मविश्वास वाढतो.