





माऊलीजींचा परीचय...
परिपूर्ण जीवनशैलीचा संदेश
एका अद्वितीय व्यक्तीचे जीवन परिवर्तनाचे रहस्य म्हणजेच ‘ ज्ञानयोग ’!
मूर्ती लहान पण कीर्ती महान असं स्वरुप असणारे माऊलीजी जणू ज्ञानाचे अगाध भांडार आहेत.
आजच्या धकाधकीच्या जीवनात, जेव्हा प्रत्येक व्यक्ती आपल्या कामाच्या आणि जबाबदार्यांच्या ओझ्याखाली असते, तेव्हा असे एक व्यक्तिमत्त्व हवे असते जे सर्व वयोगटातील लोकांना नवे आयुष्य देण्याची शक्ती बाळगते. अशी व्यक्ती म्हणजेच आपले माऊलीजी केवळ शब्दांतून प्रेरणा देत नाही, तर त्यांची तेजस्वी उपस्थिती, सदैव हसतमुख उत्साही चेहरा आणि अंतःकरणातील प्रखर प्रकाश यामुळे सर्वांमध्ये सकारात्मक बदल घडून आणतात.

माऊलीजी एक अद्वितीय गुरू आहेत... एक प्रेरणादायी प्रकाशस्तंभ आहेत.
लौकिक अर्थाने जरी माऊलीजींचे शिक्षण पदवीपर्यंत झाले असले तरी अध्यात्म, विज्ञान आणि जीवनाबद्दलचे ज्ञान हे अगाध, असीम असल्याचा अनुभव त्यांच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येक साधकाला येतो. पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन माऊलीजी अनुभवसिद्ध ज्ञान देऊन साधकांच्या जीवनात आमूलाग्र असं सकारात्मक परिवर्तन करतात. आपल्या रसाळ व सोप्या वाणीद्वारे माऊलीजी प्रत्येकाच्या हृदयात प्रवेश करुन साक्षात परमानंदाचा अनुभव देतात.
केवळ वयाच्या 22 व्या वर्षी माऊलीजींनी आपलं घरदार, व्यवसाय सोडून ज्ञानयोग ध्यान शिबीराची निर्मिती केली. ज्या वयामध्ये मुलांना चिंता असते ती कुठल्या तरी कोर्सच्या, शाखेच्या निवडीची त्या वयामध्ये माऊलीजींची चिंता होती ती संपूर्ण जगाविषयी. सगळीकडे पसरलेलं दुःख, व्याधी, खून, दरोडे, व्यसनांचा भडिमार पाहून त्यांचं हृदय व्यथित झालं. बालवयातच त्यांना आनंदी व निर्व्यसनी जगाच्या निर्मितीचा ध्यास लागला. आपल्या सर्व सुख-दुःखांना बाजूला सारत एका आनंदी, निरोगी आणि सुंदर जगाच्या उभारणीसाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले. आपले सर्वस्व अर्पण केले. चैतन्य वनात राहून साधना केली. त्यांच्या या अखंड साधनेतून, कठोर मेहनतीतून व समाजाविषयीच्या आंतरिक कळकळीतून ‘ज्ञानयोगाचा’ जन्म झाला. काही वर्षापूर्वी माऊलीजींनी लावलेल्या या छोट्याशा रोपाचे रूपांतर आज संपूर्ण जगाला मायेची, प्रेमाची, नवजीवनाची अनुभूती देणाऱ्या वटवृक्षात (कल्पवृक्षात) झालेले आहे.
ज्ञानयोग ध्यान शिबिर पूर्ण करणाऱ्या साधकांसाठी माऊलीजी हे केवळ ध्यान, प्राणायाम, योग शिकविणारे शिक्षक नसून ते साधकांच्या हृदय मंदिरात विराजमान “ गुरू परमेश्वरच” आहेत. आपल्या सान्निध्याने साधकांना भरभरून आनंद वाटणारा हा “अवलिया” आनंदयात्री बनून मागील अनेक वर्षांपासून लोकांना व्याधीमुक्त, तणावमुक्त, आनंदमय जीवनाची यात्रा घडवत आहे. केवळ ज्ञान देणे हा त्यांचा उद्देश नसून प्रत्यक्ष अनुभव प्रदान करणे हा त्यांचा मुख्य हेतू आहे. आईचं प्रेम हृदयात ठेवून ती ममता भरभरुन वाटणारे व क्षणभरात सर्वांना आपलेसे करून जिव्हाळा निर्माण करणारे माऊलीजी आज लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. सर्व साधकांच्या ओठी, नयनी व हृदयी फक्त आणि फक्त माऊलीजीच राहतात.
थेट हृदयाशी संवाद साधणारी भाषा व सुशिक्षितांपासून अशिक्षित लोकांनाही सहज समजेल अशी रसाळ अमृतवाणी, फक्त दर्शनानेच नयन, मन, आत्मा तृप्त व्हावे असा प्रेमळ, गोड, सात्त्विक चेहरा, उच्च विचार पण, अतिशयं साधे राहणीमान, सर्वांना हवं हवंस वाटणारं नम्र, लोभस व्यक्तिमत्व ही माऊलीजींची आगळी-वेगळी वैशिष्ट्ये.
"जरा बचके मिलाना नजरे उनसे ये दूनियावालों सुना है की वो, नजरोसे ही अपना बना लेते है ।”
असे ‘प्रतिभा’ आणि ‘प्रतिमेचं’ वरदान लाभलेले माऊलीजी हे प्रचंड ज्ञानाचा सागर आहेत. त्यांचा पुरातन धर्मग्रंथापासून अत्याधुनिक विषयाचा गाढा अभ्यास आहे. माऊलीजींनी विविध विषयांवरील हजारो जीवनोपयोगी सत्संगांची निर्मिती आपल्या ज्ञानसागरातून केलेली आहे. सकारात्मक ऊर्जेचं वलय लाभलेल्या माऊलीजींच्या केवळ सानिध्यात राहून साधक औषध-गोळ्यांशिवाय सहजपणे सर्व रोगांमधून मुक्तीचा अनुभव घेत आहेत. म्हणूनच वैद्यकीय शाखांपासून नामवंत डॉक्टर्स, नोकरदार, कंपन्या, दुकाने, व्यावसायीक, शिक्षण क्षेत्र, बँका, संस्था, तुरुंगातील कैदी, पोलीस अशा सर्वच क्षेत्रात माऊलीजींना मोठ्या प्रमाणात शिबीरासाठी आमंत्रित केले जात आहेत.
ध्यान, प्राणायाम आणि योगसाधनेला गंभीरतेपासून आणि अहंकारापासून दूर करुन प्रेमाच्या मार्गाने हसत-खेळत शिकविणारे आणि प्रत्यक्ष परमेश्वर प्राप्तीचा अनुभव देणारे माऊलीजींनी इतक्या कमी वयातच आपल्या हृदयस्पर्शी शैलीने हजारो लोकांना जोडणारे आणि आपल्या प्रेमाच्या धाग्यामध्ये सर्वांना गुंफून ज्ञानयोगाचा विशाल परिवार निर्माण करणारे माऊलीजी हे सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत बनले आहेत.
माऊलीजी केवळ सकारात्मकतेचा प्रचार करत नाहित; तर ते स्वतःच त्या सकारात्मकतेचे मूर्तिमंत प्रतिबिंब आहेत.. ते आम्हा प्रत्येकाला दाखवतात की, प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात बदल घडवू शकतो.
माऊलीजींचे मार्गदर्शन केवळ शब्दांपुरते मर्यादित नाही; ते एक समग्र, सुदृढ जीवनशैली देतात ज्यामुळे प्रत्येक व्यक्ती स्वतःचे सर्वोत्तम रूप साकार करण्याची प्रेरणा प्राप्त करते. त्यांच्या ज्ञानाच्या प्रकाशात लोकांना नवचैतन्य, अटळ आत्मविश्वास, आणि जीवनाला पूर्णपणे जगण्यासाठीचे धैर्य प्राप्त होते.मानसिक आणि शारीरिक आरोग्यातील समतोल साधला जातो .
परिपूर्ण जीवनशैलीचा संदेश
माऊलीजींच्या मार्गदर्शनाची खासियत अशी आहे की, ते आपल्या शब्दांमधून आणि कृतीतून एका सुंदर जीवनशैलीच समतोल आराखडा तयार करतात. त्यांच्या सल्ल्यामुळे लोकांचे केवळ मानसिक आरोग्य सुधारत नाही तर शारीरिक स्वास्थ्यातही चैतन्य प्राप्त होते. त्यांनी दाखविलेली मार्गदर्शक तत्वे आणि सकारात्मक दृष्टीकोन प्रत्येकाला त्यांच्या आत्मविश्वासाला पुनःस्थापित करण्यास मदत करतात, ज्यामुळे ते जीवनात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यास समर्थ बनतात.
सर्व वयोगटांसाठी एक आदर्श
लहान मुले
त्यांच्यातील स्वप्ने, कल्पनाशक्ती आणि उत्साह वृद्धिंगत होतात.त्यांच्या मनात जिज्ञासा आणि आनंदाच्या किरणांचा प्रकाश पसरवतो.
तरुण पिढी
नवीन दिशेचा शोध, उद्दिष्टांची स्पष्टता आणि स्वप्नांची पूर्तता यासाठी त्यांचे प्रेरणादायी विचार मार्गदर्शक ठरतात.
प्रौढांसाठी
स्पष्टता, मानसिक दृढता, नवे विचार आणि सकारात्मक दृष्टीकोन, जे जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यास मदत करतात.
वृद्धांसाठी
जगण्याची नवी उमेद, शांती, समाधान आणि प्रेमाने परिपूर्ण वातावरण निर्माण होते, ज्यामुळे त्यांना पुन्हा तरुणपणाची अनुभूती मिळते.
एक नवीन अध्याय
- चला, एकत्र येऊन जीवनातील प्रत्येक क्षणाला हसत खेळत ,आनंदाने, उत्साहाने ,निरोगी ,भरभरून जगुयात.
- आता अधिक समाधानकारक जीवन जगण्याची वाट कशाला पाहायची? माऊलीजींसोबत या जीवन बदलणाऱ्या प्रवासाचा भाग बना.
- माऊलीजींच्या प्रेरणादायी सत्संग (विचारसरणी), गोपाळकाला ( पौष्टिक आहार ) आणि हसत खेळत सकाळची साधना (stretching, stroking and strengthning) तुमचे जीवन संतुलित आणि समृद्ध करा..

Quotes

क्रोध करून त्या सर्व गोष्टी गमावू नका ज्या तुम्ही शांत राहून कमावलेल्या आहेत.. माऊलीजी

वाईट सवयींमुळे आपल्या माणसांना सोडण्यापेक्षा, आपल्या माणसांसाठी वाईट सवयींना सोडा.. माऊलीजी

तुम्हाला जे वाटेल ते करा.. पण एवढे पक्के लक्षात ठेवा की..कर्म कधीच पत्ता विसरत नाही.. माऊलीजी
Blog

गुरूकृपा: जीवन घडवण्याचा मार्ग
मनुष्य आपल्या कर्मानेच आपले आयुष्य घडवतो आपण जे दुसऱ्याला देतो तेच आपल्याला मिळते दुसऱ्याच्या आयुष्यात नरक निर्माण करणारे लोक नरकातच

मनावर विजय मिळवा – बोधकथा
एकेकाळी एक वृद्ध योद्धा होता. त्याच्या काळातील तो सर्वत्र प्रसिद्ध असा योद्धा होता. त्याला कोणत्याही प्रकारच्या युद्धात कुणीच हरवू शकत

आयुष्यातील नकारात्मक लोक
एखाद्या कारल्याला तुम्ही चारही धाम करून आणा ते कडू ते कडूच राहते.. तसं काही लोकांना कितीही प्रेम करा, ते त्यांचा
Video
दिवसाची सकारात्मक सुरुवात!
सकाळची साधना
दररोज सकाळी ५:३८ ते ७:३० या वेळेत व्यायाम करा
प्राणायाम, ध्यान आणि योगामुळे तणाव कमी होतो, आरोग्य सुधारते आणि आत्मविश्वास वाढतो.