बांधून ठेवलं म्हणून कोणी कोणाशी जोडल्या जात नाही..
बांधीलकी असेल तर कोणी कोणापासून दूर जात नाही..
तुझ्यावर उपकार म्हणून मी तुझ्यासोबत राहतो हा अहंकार आहे..
पण तू आहे म्हणून मी आहे ही जाणीव म्हणजेच प्रेमाचा साक्षात्कार आहे..
समर्पण असेल तरच जीवन अर्पण करता येते..
मग कनाकनात प्रेम दिसून आपले हृदय सुद्धा दर्पणच होते..
प्रेमाची जाणीव नसेल तर सोबत असलेल्या माणसांची किंमत नसते..
प्रेमाचा साक्षात्कार होताच प्रेमच आपल्या जीवनातील हिम्मत बनते..
ज्ञानयोगातून येऊ द्या तुमच्यात प्रेमाचा भाव…
म्हणजे संकट घालणार नाही तुमच्या जीवनावर घाव..
प्रेमाची शक्ती म्हणजे समुद्रात जीवन वाचवणारी नाव..
म्हणून तर प्रत्येक क्षणात घेत राहा देवाच नाव..
प्रेममय झालं की भक्ती कळते..
भक्ती कळाली की शक्ती येते..
शक्तीची जाणीव झाली
की जिवंतपणीच मुक्ती मिळते..
माऊलीजी😊

