Official Website Of Maulijee – Dnyanyog Pratishthan, Chaitanyavan

दुःखातून आनंदाकडे जाण्यासाठी

आपल्या माणसांकडून सारखा सारखा अपेक्षाभंग व्हायला लागला की माणसाच्या सहनशक्तीचा अंत होतो…

मग कोणाशी बोलावसं वाटत नाही..

माणूस शांत राहण्याचा मार्ग स्वीकारतो..

कारण त्याला कळतं की बोलून काही फायदाच नाही..

 

जीवनातील विश्वासघात किंवा काही नकारात्मक घटना माणसाला इतक्या बदलून टाकतात की मोकळं जगणारा

आनंदात राहणारा माणूस सुद्धा आत घुसमटत आणि वेदना घेऊन दुःखात जगत राहतो..

तोंडावर हसू आणि आत आसू

अशी त्याची अवस्था होते..

 

आपल्याच माणसांकडून आपली फसगत झाली ही भावनाच त्याच्या काळजाला जखम करते..

ती जखम त्याच्या हृदयाचा ठाव घेते तरीही त्याला जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात आणि इतरांसमोर हसावं लागतं..

 

पण यातूनच त्याचा मूळ आनंदी स्वभावाला कीड लागायला सुरुवात होते..

म्हणूनच अशा प्रसंगातून बाहेर येणे हे त्याला त्याच्या जीवनासाठी आवश्यक आहे..

हे लवकरात लवकर कळालं पाहिजे..

 

यातून बाहेर येण्यासाठी या १० गोष्टी करा व स्वतः ला हे सांगा

१. आधी स्वतःला सांगावं की मला यातून बाहेर पडायचे आहे..

२. माझं स्वतःचं आयुष्य मला आनंदात जगायचं आहे.

३. मी दुसऱ्यासाठी मलाच त्रास करून घेणार नाही.

४. ⁠मी एकच गोष्ट पकडून ठेवणार नाही.

५. ⁠माझ्या आयुष्यात एका प्रसंगामुळे किंवा व्यक्तीमुळे माझे आयुष्य संपणार नाही.

६. स्वतःला चांगल्या कामात गुंतवून चांगल्या विचारांसोबत जोडून यातून स्वतः आणि स्वतःला बाहेर काढणं हे मला शक्य आहे असे म्हटलं तर नक्कीच सर्व शक्य होईल.

७. ⁠ मी कोणाचं वाईट केलं नाही माझं वाईट होणार नाही.

८. ⁠परमेश्वर माझ्यासोबत नेहमीच आहे.

९. ⁠मी माझा आयुष्य भरभरून जगणार आहे.

१०. ⁠ भुतकाळात घडलेल्या घटनांचा विचार जेव्हा येऊ लागला तेव्हा लगेच स्वतःला वर्तमानात आणा..

 

 ⁠माऊलीजी😊

Scroll to Top