प्रेम म्हणजे..
मी आनंदी आहे यापेक्षा
तुमच्या चेहऱ्यावरील आनंदाने मला जास्त आनंद होतो..
प्रेम म्हणजे..
मला माझ्या अश्रूंचे काहीच वाटत नाही,
पण तुमच्या डोळ्यात मी अश्रू पाहू शकत नाही..
प्रेम म्हणजे..
माझ्या जीवनाचे काही नाही
पण तुम्ही सोबत असाल तर मी जीवंत आहे असे वाटते..
प्रेम म्हणजे..
उन्हाळा पावसाळा हिवाळा
या कोणत्याही ऋतू मध्ये
फक्त तुमची साथ असेल तर मला सर्व ऋतू फुललेले दिसतात..
प्रेम म्हणजे..
गुणदोषांच्या पलीकडे जाऊन
तुम्ही जसे आहात
तसेच मला हवे आहात..
प्रेम म्हणजे..
शरीराच्या सौंदर्य पलिकडे जाऊन, मनाचे मनाशी जोडलेले निरपेक्ष नाते.
प्रेम म्हणजे..
तुम्ही सोबत आहात आणि तुमच्यातच ईश्वर दिसत आहे,
खरंतर तुम्ही आहात म्हणूनच ईश्वरावर विश्वास आहे..
प्रेम म्हणजे..
न बोलता, मौनातून साधलेला संवाद..
सोबत नसताना तुम्ही सोबत आहात ही जाणीव..
आणि प्रत्येक श्वासात तुमचे चांगले व्हावे हीच प्रार्थना..
माऊलीजी😊

