तुम्हीच विचार करा तुमच्या चिडचिड करण्याने तुमचे मन आणि घरातील वातावरण किती खराब होते..
बरं त्यामुळे घरातील लोक आपले ऐकतात हा आपला गैरसमज आहे..
उलट नातेसंबंध खराब होतात, होणारे काम होत नाही, वाद वाढतात..
पुढे यातूनच रोग येतात..
ही सवय कमी करण्यासाठी जेव्हा असे होईल तेव्हा
👉 श्र्वासाला पहा..
👉 दीर्घश्वसन करा..
👉 मनात उलटे अंक मोजा..
👉 त्या परिस्थिती पासून अलिप्त व्हा..
👉 दुसऱ्यां मधील चुका काढणे बंद करा
👉 होणाऱ्या परिणामांची जाणीव ठेवा
👉 तिथून निघून जा
किंवा अजून काही उपाय करा पण मन शांत ठेवा..
आणि एकदा हे तुम्ही मनापासून ठरवले तर नक्कीच शक्य होईल..
बोला, ठेवणार ना ही जाणीव?
माऊलीजी 😊

