जीवनात असे अनेक लोक येतात की
ते कोणीच नसताना तुम्ही त्यांना तुमचे सर्वस्व दिले, त्यांच्यासाठी तुम्ही जगला..
खर तर तुमची त्यात कुठली अपेक्षाही नव्हती,
फक्त प्रेमापोटी तुम्ही ते केले..
पण हेच माणसं नंतर बदलतात,
तुमच्यासोबत बोलणं कमी करतात,
आधी सर्व काही शेअर करणारे, आता तुम्हाला गृहीत धरतात..
आधी स्वतःच्या स्वार्थासाठी नेहमी फोन करणारे, आता तुम्हाला कधीही कॉल करत नाही,
तुम्ही जे काही केलं ते करून फार काही उपकार केले नाही असे दाखवतात..
तेव्हा तुम्ही फार वाईट वाटून घेऊ नका..
जीवन असेच असते,
जीवनाचे हे सत्य स्वीकारून हसत हसत पुढे जात रहा..
ते त्यांच्या स्वभावानुसार जगतील,
तुम्ही तुमच्या स्वभावानुसार जगा..
त्यांना काही कळाले पाहिजे ही अपेक्षा सोडून द्या नाहीतर त्याचा फक्त तुम्हालाच त्रास होईल..
आपण कोणालाही जबरदस्तीने जाणीव देऊ शकत नाही..
तेव्हा जास्त विचार करू नका, स्वतःला त्रास करून घेऊ नका,
तुम्ही तुमचा प्रेमळ स्वभाव असाच ठेवून हसत, आनंदाने जगा..
माऊलीजी😊

