जीवनात संकटांची मालिका सुरू असेल
तर माझे काही चुकले का?
माझ्याच आयुष्यात असे का घडत आहे?
असे विचार करत अजून निगेटिव्ह होऊ नका..
अश्याने तुमच्यात विश्वास राहणार नाही.
विश्वास नसेल सर्व संपल्या सारखे वाटेल..
अशावेळी काहीच विचार करायचा नाही,
फक्त जे जे
त्या वेळेला करणे शक्य आहे ते ते त्या वेळेला करत राहा..
माझे चांगलेच होणार आहे हा भाव ठेवा..
स्वतःचा संयम आणि विश्वास बिलकुल ढळू देऊ नका.
हसत रहा, चांगल्या विचारांशी जोडलेले रहा, मनात फार प्रश्न निर्माण करू नका..
एक दिवस संकट आपोआप निघून जाईल..
तोपर्यंत हिम्मत ठेवा..
आणि विशेष म्हणजे लक्षात असू द्या की,
मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो आहे..
माऊलीजी😊

