जबाबदारीची जाणीव ही शिकवून येत नाही.
ती रक्तातच पाहिजे आहे.
जेव्हा हृदयातून हे सर्व माझं आहे असं वाटतं, तेव्हाच अंत:करणात जबाबदारीची जाणीव निर्माण होते.
त्या जाणिवेतून आपोआपच कार्य करावे वाटते,
ते कार्य करतानाच तुम्हाला आनंद होतो,
कोणाला दाखवण्यासाठी नाही तर,
कामाशिवाय तुम्ही राहू शकत नाही म्हणून तुम्ही नेहमी कार्यरत राहता.
आणि तुमच्या हातून काहीतरी चांगलं कार्य घडते..
लोक तुमच्यावर आपोआप विश्वास ठेवतात,तुम्हाला अधिकार मिळतात.
ही जाणीव नसेल तर तुम्ही फक्त सांगकामे राहतात.
कुणीतरी सांगितलं त्यामुळे तुम्हाला ते काम करावं लागेल आणि त्या कामात क्वालिटीचं नसेलच कारण तुमचा “अंतरात्मा* त्यात नसतो असे लोक नोकरच राहतात.
सर्व महान व्यक्तींमध्ये आणि सर्वसामान्य लोकांमध्ये बस हा एकच फरक असतो ते म्हणजे जबाबदारीची जाणीव..
माऊलीजी😊

