माझे काहीच चांगले होऊ शकत नाही असे म्हणणे आधी बंद करा..
पुन्हा एकदा प्रयत्न तर करा हो..!
नुसतेच टेन्शन घेत बसून राहिले तर काय होणार आहे..?
तुम्ही प्रयत्नच केले नाही तर काहीच बदल होणार नाही..
जिथे आहात तिथून नवीन सुरुवात करा..
अपयशाला घाबरू नका, अपयश आले तर फार फार काय होईल ?
त्यातून काहीतरी अनुभवच येईल,ते अनुभव गाठीशी ठेवा, ते कुठे ना कुठे कामाला येतील नक्की.
पण कधीच हार मानू नका..
अर्ध्यातच सोडून देऊ नका..
हिम्मत हारु नका
स्वतःला प्रॉमिस करा, मी रडत बसणार नाही, जे आहे त्यातून काहीतरी चांगले करत राहील
हे वाचून जो पुन्हा नव्या उमेदीने सुरुवात करेल त्याला नक्की यश मिळेल हा माझा शब्द आहे
माऊलीजी😊

