Official Website Of Maulijee – Dnyanyog Pratishthan, Chaitanyavan

आयुष्यातील नकारात्मक लोक

एखाद्या कारल्याला तुम्ही चारही धाम करून आणा ते कडू ते कडूच राहते..

तसं काही लोकांना कितीही प्रेम करा, ते त्यांचा संशयी स्वभाव, हेकेखोरपणा, कृतघ्नपणा सोडणारच नाहीत..

तुम्ही त्यांच्यासाठी काय करत आहे हे त्यांना कळू शकत नाही,

कारण ते आपल्यावर प्रेम करतात असं तर म्हणतात पण त्यांचा आपल्यावर पूर्ण विश्वास कधीच नसतो..

अशा लोकांपासून जमलं तर दूरच राहिलं पाहिजे..

आणि दूर जाणे जमत नसेल तर त्यांच्या शब्दांचा परिणाम आपल्यावर करून घेऊ नका.

स्वतःला एखाद्या कामात व्यस्त ठेवा.

कारण तुम्ही कितीही खुश असाल तरीही त्यांच्या सानिध्यात आलात की पूर्ण नकारात्मक होऊन जातात,

खरंतर प्रेम एकमेकांना समजून घेण्यात असतं, आपल्यापेक्षा समोरचा खुश राहायला पाहिजे असं वागणं-बोलणं-चालणं आपलं हवं.

पण या लोकांना हे कधीच कळू शकत नाही कारण ते फक्त स्वतःचा विचार करतात.

स्वार्थीपणा, मला काय मिळेल हेच यांच्या सतत मनात असते..

म्हणताना तर हे म्हणतात की मी प्रेम करतो पण त्यांना प्रेमाची परिभाषा कळलेली नसते.

आणि याचा त्रास फक्त आपल्याला होतो,

जो आपलं प्रेम समजू शकत नाही तो काय आपल्यावरती प्रेम करणार..?

प्रत्येक वेळेला आपण त्यांना माफ करतो तेही म्हणतात ठीक आहे मी आता असं वागणार नाही, पण जेव्हा त्यांना चांगलं वागण्याची संधी असते तेव्हा ते काहीतरी घाण बोलून आपल्या मनात नरकच निर्माण करणार..!

कारण यांना प्रेमापेक्षा अहंकार-संशय-अविश्वास-भीती हे महत्त्वाचे असते.

बरं याचा त्रास आपल्याला जास्त होतो कारण आपण कधी त्यांना फसवलेलं नसतं, आपण कधी आपल्या मनात यांच्या बद्दल वाईट विचार केलेला नसतो पण यांच्या मनातली घाण, विष हे आपल्या वरती ओकतात..

अशा वेळेला होणारा मानसिक त्रास कमी करण्यासाठी नामस्मरण करा, प्रार्थना करा, मन शांत ठेवा, सत्संग ऐका, आणि देवाला सांगा की त्यांना सद्बुद्धी दे..

यापेक्षा आपल्या हातात तरी दुसरं काय असतं ?

तुम्हाला काय वाटतं?

माऊली जी😊

Scroll to Top