मनुष्य आपल्या कर्मानेच आपले आयुष्य घडवतो
आपण जे दुसऱ्याला देतो तेच आपल्याला मिळते
दुसऱ्याच्या आयुष्यात नरक निर्माण करणारे लोक नरकातच जातात
दुसऱ्याच्या आयुष्यात स्वर्ग निर्माण करणारे लोक जिवंतपणीच स्वर्ग अनुभवतात
दुर्दैवाने अहंकार असा असतो की नरक निर्माण करणाऱ्याला असेच वाटते की तो स्वतःच फक्त बरोबर आहे, त्याला चांगले सांगणारे लोक त्याचे दुश्मन वाटतात
जे लोक समर्पित नसतात त्यांना गुरू काय आहे ते कधीही कळू शकत नाही, देव असूनही ते देवापासून दूर असतात
चुकीची जाणीव झाली तरच स्वतःला बदलण्याची मानसिक तयारी होते,
पुन्हा पुन्हा एकच चूक आपण करत असलो तर आयुष्य कधीच बदलू शकत नाही
गुरूच्या मार्गावर चालून स्वर्ग निर्माण करण्याची शक्ती तेव्हाच येते जेव्हा संपूर्ण समर्पण व जागरूकता असते..
गुरूचे ज्ञान जीवनात वापरले नाही तर ते ज्ञान डोक्यात शिरून विष बनते, अहंकार वाढतो, स्वतःच्या वागण्याने आपण स्वतःलाच नष्ट करतो
पण तेच मनात श्रध्दा ठेवून ज्ञान वापरले तर जीवन अमृत बनते, आनंद होतो, आपली प्रगती होते..
माऊलीजी😊